Monday, July 1, 2024

‘सिद्धार्थ तुझा आहे आणि तुझाच राहणार’, शहनाझ गिलचे नवीन गाणे बघून चाहत्यांना अश्रू अनावर

‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाझ गिल सदम्यात गेली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांना देखील खूप दुःख झाले. शहनाझ तर सोशल मीडिया तसेच तिच्या शूटिंगपासून देखील दुरावली होती. अशातच त्याच्या मृत्यूनंतर शहनाझने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नुकतेच शहनाझचे ‘तू यही है’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. सिद्धार्थ आणि शहनाझची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडत होती. या गाण्यातून तिने सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावरून असे जाणवत आहे की, तिच्या मनात अजूनही सिद्धार्थ आहे आणि तिला त्याला कधीही विसरू शकणार नाही. आतापर्यंत एकही क्षण असा गेला नाही जेव्हा तिला सिद्धार्थची आठवण आली नाही. तिच्या या नवीन गाण्याचा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

शहनाझच्या या गाण्याचे बोल एवढे सुंदर आहेत, की तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत हे गाणे ऐकाल. शहनाझने सिद्धार्थच्या सगळ्या आठवणी खास बनवल्या आहेत. हे गाणे पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, सिद्धार्थ शहनाझच्या आयुष्यातील किती महत्वाचा आणि खास व्यक्ती होता. (Shehnaaz gill song tu yaheen hai relased fans become emotional)

या गाण्यात ‘बिग बॉस १३’, मधील सिद्धार्थचे काही व्हिडिओ घेतले आहेत, ज्यामध्ये तो शहनाझसोबत मस्ती करताना दिसत आहे. तसेच दोघांचे काही भावनिक सीन देखील दाखवले आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये शेवटी सिद्धार्थचा आवाज ऐकू येतो. ज्यामध्ये सिद्धार्थ तिला ‘सना’ या नावाने हाक मारत आहे. या गाण्याची सुरुवात शहनाझचा हिट डायलॉग ‘तू मेरा है ओर मेरा ही रहेगा, मुझे गेम नहीं जितनी, मुझे तुझे हासील करना है,’ पासून होते.

त्यांचे हे नाव ऐकून सिडनाझचे चाहते खूप भावनिक झाले आहेत. गाणे पाहून अनेकांना त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “सिद्धार्थ शुक्ला तुझा आहे आणि तुझाच राहणार.” आणखी एकाने लिहिले आहे की, “गाणे ऐकताना मी माझे अश्रू थांबवू शकलो नाही.”

त्यांच्या या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा