Saturday, June 29, 2024

‘शेरदिल द पिलीभीत सागा’चा दमदार ट्रेलर रिलीझ, सिंहाची शिकार करायला जंगलात जाणार पंकज त्रिपाठी

चाहते अनेक दिवसांपासून पंकज त्रिपाठींच्या (Pankaj Tripathi) ‘शेरदिल: द पिलीभीत सागा’ या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर आज निर्मात्यांनी प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपवली आहे. ‘शेरदिल: द पिलीभीत सागा’चा ट्रेलर रिलीझ झाला आहे, ज्यामध्ये पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या चित्रपटातही पंकजचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे, ज्याची झलक या ट्रेलरमध्ये सहज पाहायला मिळते. पंकजसोबत या चित्रपटात सयानी गुप्ता (Sayani Gupta) देखील आहे, जी अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

टी-सिरीज आणि रिलायंस एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटे १७ सेकंदांचा आहे. ज्याची सुरुवात पंकज त्रिपाठीपासून होते, जे त्यांच्या गावातील गरीब परिस्थितीमुळे सरकारी कार्यालयात बसून आहे. त्यानंतर पंकज त्रिपाठी एका मिशनवर निघतात, जेणेकरून ते त्यांच्या गावातील परिस्थिती सुधारू शकतील. उत्तम अभिनयासोबतच पंकज त्रिपाठींची हलकीफुलकी कॉमेडीही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामुळे ट्रेलर अधिक मजेशीर बनत आहे. (sherdil the pilibhit saga trailer out)

ट्रेलरपूर्वी ‘शेरदिल: द पिलीभीत सागा’चे पोस्टर रिलीझ करण्यात आले होते, ज्यामध्ये पंकज त्रिपाठींच्या लूकने सर्वांची मनं जिंकली. या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी सिंहाच्या डोळ्यात दिसत होते, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रपटात पंकज सिंहाची शिकार करण्यासाठी जंगलात जातात आणि याचीच एक झलक पोस्टरमध्ये दाखवण्यात आली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा
पंकज त्रिपाठींच्या या चित्रपटाची कथा जंगलाच्या काठावर वसलेल्या गावातील लोकांची आहे, ज्यांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या चित्रपटात शहरीकरणामुळे कमी होत जाणारे जंगल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांसोबतच, माणूस-प्राणी संघर्ष आणि गरिबी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सृजित मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होत आहे. 

 

हे देखील वाचा