Tuesday, July 9, 2024

शर्लिन चोप्राकडून राज अन् शिल्पा विरोधात तक्रार दाखल, आर्थिक फसवणूक सहित शारीरिक शोषणाचा केला खुलासा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवणे आणि त्यांची विक्री करणे या प्रकरणी दोन महिने तुरुंगात होता. त्याला १९ जुलैला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी त्याला जामीन मिळाला. त्याच्या या प्रकरणामध्ये आता नवीन खुलासा झाला आहे आणि त्याच्या अडचणी आता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज आणि शिल्पा विरोधात फसवणूक आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने राजच्या जेएल कंपनीसाठी तीन व्हिडिओ शूट केले होते. त्यावेळी तिला ठरवून दिलेली रक्कम पूर्ण देण्यात आली नाही, असे तिचे म्हणणे आहे. तिने पत्रकारांशी संवाद साधत असतानाचा एक व्हिडिओ ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. (Sherlyn Chopra filed FIR against Raj Kundra)

या व्हिडिओमध्ये ती हताश होऊन रडताना दिसत आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना राजला उद्देशून ती म्हणाली की, “मुलींबरोबर आणि त्यांच्या शरीराशी संबंधित अश्लील मागण्या करुन तुम्ही त्यांचे पैसे पूर्ण का नाही करत? तुम्ही त्यांना चुना का लावता? अशा पद्धतीने तुम्ही मुलींना का फसवता? यालाच नैतिक व्यवसाय म्हणतात का?”

पुढे व्यवसायातील नैतिकते विषयी बोलताना ती म्हणाली की, “तुम्हाला व्यवसायिक बनायचे असेल तर जा आणि बघा टाटा कसे व्यवसाय करतात. पूर्ण नैतिकतेने ते व्यवसाय करतात. ते जी आश्वासने देतात ती पूर्णही करतात. तुम्ही करता का असं?

त्यानंतर थोडी भावुक होत ती म्हणाली की, “तुम्ही कलाकारांच्या घरी जाऊन त्यांना धमकवता. तसेच त्यांचे लैंगिक शोषण करता. तुम्ही अंडरवर्ल्ड आणि चित्रपटांमधून बाहेर काढण्याची धमकी देता. पण मी आता घाबरणार नाही. इथे गोष्ट फक्त पैशांची नाही आहे. मला आता हे सहन होत नाहीये.”

शिल्पा शेट्टीची यामध्ये काय भूमिका आहे असे विचारले असता ती म्हणाली की, “शिल्पाने मला सांगितले ही खूप सुरक्षित कंपनी आहे. तुला भविष्यात तुझ्या कारकिर्दीमध्ये याचा उपयोग होईल.”

एप्रिल महिन्यात अभिनेत्रीने राज विरोधात तक्रार दाखल केली होती त्यावेळी असे समोर आले होते की, शर्लिनने आतापर्यंत राजच्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. तसेच एका प्रोजेक्ट साठी तिला ३० लाख रुपये मिळाले आहेत. तिच्याकडे राजचे असे १५ ते २० प्रोजेक्ट होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवरात्रीच्या निमित्ताने चाहत्यांना पाहायला मिळाला बोल्ड मोनालिसाचा पारंपारिक अंदाज, पाहा फोटो

-ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, उर्वशी रौतेलाने केलं ‘असं’ ट्वीट; आता करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

-ड्रीमगर्लपासून ते बेबोपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी थाटलाय विवाहित पुरुषांसोबत संसार; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश

हे देखील वाचा