Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ‘शेरशाह’चे पहिले रोमॅंटिक गाणे प्रदर्शित; सिद्धार्थ-कियाराच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांची मने

‘शेरशाह’चे पहिले रोमॅंटिक गाणे प्रदर्शित; सिद्धार्थ-कियाराच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांची मने

मागील बऱ्याच काळापासून चर्चेत असणारा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा ‘शेरशाह’ खूपच चर्चेत होता. नुकताच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत पसंतीची पोचपावती तर दिलीच आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता खूपच वाढली आहे.

आता या सिनेमातील पहिले गाणे ‘रातां लम्बियां’ प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे एक रोमँटिक गाणे असून यात सिद्धार्थ आणि कियारा यांच्यामधील प्रेम आणि काही प्रेमळ क्षण दाखवले जात आहे. या गाण्यातली या दोघांची रोमँटिक आणि प्रेमाने ओतप्रोत असलेली केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या गाण्यात हे दोघं लपून लपून भेटत, सिनेमा बघायला जातात, एकमेकांना पत्र लिहितात. असे अनेक छोटे आणि अमूल्य क्षण दिसत आहे. (Shershaah song Rataan Lambiya released)

या सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर आणि
दमदार ट्रेलर आहे. हा ट्रेलर कारगिल दिनाच्या निमित्ताने एक दिवस आधी कारगिल बेसमध्ये भारतीय सैन्याच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. ‘शेरशाह’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांसह समीक्षकानांही खूप आवडला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो दमदार ऍक्शन करताना आणि भूमिका निभावताना दिसेल. कियारा आणि सिद्धार्थ यांची केमेस्ट्री देखील खूप छान दिसत आहे.

सिद्धार्थ या सिनेमात कारगिल युद्धाचे हिरो असणाऱ्या शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत दिसणार असून, कियारा सिद्धार्थची प्रेयसी डिंपल चिमाची भूमिका निभावत आहे. डिंपलने विक्रम यांना त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक पावलावर साथ दिली. कॅप्टन विक्रम यांनी कारगिल युद्धात देशाला विजय मिळवून देण्यात मोठी कामगिरी केली आणि यात त्यांना वीरगती प्राप्त झाली. विक्रम यांना ‘शेरशाह’ हे टोपणनाव दिले होते, याच नावावरून सिनेमाचे नाव शेरशाह ठेवण्यात आले आहे. या सिनेमातून विक्रम यांच्या युद्धातील पराक्रमाला या चित्रपटाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात आली आहे.

तनिष्क बागची यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला जुबिन नौटियाल आणि असीस कौर यांनी स्वरबद्ध केले आहे. विष्णूवर्धन दिग्दर्शित या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणीसह शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर, पवन चोपड़ा आदी कलाकारांच्या भूमिका असणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा आडवाणी यांचा शेरशाह हा सिनेमा येत्या १२ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऍमेझॉन ओरिजिनल मूवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा