Friday, December 6, 2024
Home अन्य शिखर धवनवर देखील चढले ‘पुष्पा’ सिनेमाचे वेड, दमदार अभिनय करत म्हटला सिनेमातील ‘हा’ संवाद

शिखर धवनवर देखील चढले ‘पुष्पा’ सिनेमाचे वेड, दमदार अभिनय करत म्हटला सिनेमातील ‘हा’ संवाद

चित्रपट हे फक्त सामान्यच माणसांचे नाही तर आमपासून खासपर्यंत सर्वच स्तरातील लोकांचे मनोरंजन करतात. तसे पाहिले तर क्रिकेट आणि सिनेमे यांचे खूपच जवळचे नाते आहे. अनेक कलाकारांनी क्रिकेटससोबत लगीनगाठ बांधली आहे. मात्र याव्यतिरिक्त देखील क्रिकेटर्स आणि कलाकार यांचे एक वेगळे नाते आहे. अनेक क्रिकेटर्स चित्रपटांमध्ये काम करताना देखील दिसले आहे तर काही चित्रपटांसाठी तुफान वेडे आहेत. अनेकदा क्रिकेटसचे चित्रपट प्रेम फॅन्ससमोर व्यक्त होताना दिसते. चित्रपटांसाठी वेडा असलेला एक क्रिकेटर म्हणजे भारतीय क्रिकेट टीममधील गब्बर अर्थात शिखर धवन. शिखर धवनचे बऱ्याचवेळा क्रिकेटप्रेमी लोकांसमोर येत असते. सोशल मीडियावरही तो अनेकदा सिनेमांशी संबंधित विविध रिल्स आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतो.

नुकताच शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो जबरदस्त अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या ‘पुष्पाः दा राइज’ सिनेमातील अल्लू अर्जुन सारखा अभिनय करताना दिसून येत आहे. शिखर धवनने ‘पुष्पाः दा राइज’ सिनेमातील अल्लू अर्जुनच्या संवादावर हा व्हिडिओ तयार केला आहे. यात तो सिनेमातील मुख्य संवाद म्हणताना दिसत आहे. शिखरच्या या मजेशीर व्हिडिओवर फॅन्ससोबत सेलिब्रिटींच्या देखील भरभरून कमेंट्स येत आहे. खुद्द अल्लू अर्जुनने देखील त्याच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केली आहे. धवनने देखील त्याच्या कमेंटला उत्तर देतांना सिनेमाच्या यशासाठी त्याचे अभिनंदन केले आहे.

या व्हिडिओमध्ये शिखरचा लुक देखील खूपच वेगळा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा सॅंडो टि शर्ट घातला असून, त्यावर गोल हॅट घातली आहे. तो म्हणत आहे की, “पुष्पा….पुष्पा राज…हम झुकेगा नहीं….।” आतापर्यंत या व्हिडिओला १७ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, भरभरून कमेंट्स देखील येत आहे.

भारतीय क्रिकेट टीममधील स्टार खेळाडू म्हणून शिखर ओळखला जातो. सध्या शिखर दक्षिण आफ्रिकेत असून, त्याने सहा महिन्यानंतर क्रिकेट संघात पुनरागमन केले असून, दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी त्याची निवड झाली आहे.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा