Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड कसलं भारी! क्रिकेटनंतर बाॅलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार शिखर धवन, हुमा कुरेशीसाेबत करणार राेमान्स

कसलं भारी! क्रिकेटनंतर बाॅलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार शिखर धवन, हुमा कुरेशीसाेबत करणार राेमान्स

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री हुमा कुरेशीचा ‘डबल एक्सएल‘ चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चर्चा चाहत्यांमध्ये जोरात सुरू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुलींच्या फिगर आणि लठ्ठपणावर बनवलेल्या ‘टॅबू’वर सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात हुमा आणि सोनाक्षी सिन्हा 2 ओव्हरवेट मुलींची भूमिका साकारत आहेत. आता चित्रपटला घेऊन आणखी एक नवीन अपडेट समोर आले आहे. क्रिकेटर शिखर धवनही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शिखर धवन हुमा कुरेशीसाेबत दिसणार रोमान्स करताना 
क्रिकेटर शिखर धवन (shikhar dhawan) बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. हुमा कुरेशी(huma qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा(sonakshi sinha) यांच्या डबल एक्सएल(Double XL) या चित्रपटातून शिखर धवन अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. शिखर धवन डबल एक्सएल या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

सोशल मीडियावर फोटो केला शेअर
हुमा कुरेशीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शिखर धवनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फाेटाेमध्ये शिखर आणि हुमा रोमँटिक डान्स पोजमध्ये उभे आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत दोघेही जवळच बसलेले आहेत. या फोटोवरून असा अंदाज लावला जात आहे की, शिखर धवन चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 शिखरला आवडली चित्रपटाची कथा 
शिखर धवनने या चित्रपटासंदर्भात मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपला अनुभव शेअर केला आहे. शिखर धवनने  सांगितले की, “चित्रपटाच्या कथेने त्याच्यावर खोलवर छाप सोडली आहे.” शिखर म्हणाला की, “क्रिकेटर म्हणून माझे आयुष्य खूप व्यस्त होते. अशा परिस्थितीत मी नेहमीच मनोरंजनासाठी चांगल्या चित्रपटांचा सहारा घेत हाेताे. या चित्रपटाची ऑफर माझ्याकडे आली, तेव्हा मी स्टाेरी ऐकली. या चित्रपटाच्या कथेने माझ्यावर खोलवर छाप सोडली. तरूण मुला-मुलींनी कितीही का होईना, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे सोडू नये, असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात देण्यात आला आहे.”

14 ऑक्टाेबरला चित्रपट प्रदर्शित हाेणार सिनेमागृहात
‘डबल एक्सएल’ हा चित्रपट सतराम रमानी यांनी दिग्दर्शन केला आहे. हा चित्रपट 14 ऑक्टाेबरला रिलीज हाेणार असून त्यादिवशी आयुष्यमान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह यांचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील रिलीज हाेणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करादैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शुभ मंगल सावधान! कियारा अन् सिद्धार्थ पुढच्या वर्षी या महिन्यात अडकणार लग्न बंधनात

गुड न्युज! गुरमीत आणि देबीनाच्या घरी पुन्हा एकदा येणार नवीन पाहुणा, जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा