Tuesday, July 9, 2024

क्या बात है! क्रिकेटर शिखर धवन लवकरच करणार अभिनयात पादर्पण, ‘या’ चित्रपटात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते तर सर्वश्रुत आहे. अनेक क्रिकेटर मनोरंजनविश्वात अभिनय करताना आपण पाहिले आहेत. काहींना यश मिळाले तर काहींना नाही. मात्र आता या यादीत अजून एका मोठ्या क्रिकेटरचे नाव सामील झाले आहे. भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर शिखर धवन लवकरच अभिनयात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार लवकरच शिखर धवन एका बिग मॅनस्ट्रीम सिनेमासोबत अभिनयाची सुरुवात करणार आहे. शिखर आधीच या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली असून, अजून या सिनेमाचे नाव ठरलेले नाही.

प्राप्त माहितीनुसार शिखर नेहमीच कलाकारांचा खूपच सन्मान करतो. जेव्हा त्याला या सिनेमातील एका भूमिकेसाठी विचारणा केली गेली तेव्हा तो आनंदाने यात सामील झाला. चित्रपटाच्या निर्मात्यांना शिखर त्या भूमिकेसाठी जास्त योग्य वाटल्याने त्याला ही भूमिका ऑफर करण्यात आली. काही महिन्यांआधी शिखराला यासाठी विचारण्यात आले होते. या सिनेमात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत न दिसता शिखरची पूर्ण भूमिका असेल. हा सिनेमा याचवर्षी प्रदर्शित होऊ शकतो. या सिनेमात शिखरसोबत अजून कोणकोण असेल याबाबत अधिक माहिती समजली नसली तरी आता या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये शिखर धवनला अक्षय कुमारच्या ‘रामसेतू’ सिनेमाच्या सेटवर पाहण्यात आले होते. या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. शिखराला सेटवर पाहिल्यानंतर तो या सिनेमात दिसणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र तेव्हा तो त्याचा मित्र असलेल्या अक्षय कुमरला भेटायला गेल्याचे सांगण्यात आले. अक्षयसोबतच रणवीर सिंगसोबत देखील शिखरचे जवळचे नाते आहे. सध्या शिखर आयपीएल सामन्यांमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा