Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिल्पा शेट्टीला ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, फेरविचाराचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेयर यांनी १६ वर्षांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये सार्वजनिक व्यासपीठावर किस केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांच्यावर केस देखील दाखल करण्यात आली होती. त्यात कोर्टाने शिल्पाला दोषमुक्त म्हणून जाहीर केले होते. याच निर्णयाचं विरोधात एक पिटिशन दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने निर्णय दिला असून, ही पिटिशन फेटाळण्यात आली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिल्पा शेट्टी हिला दिलासा मिळाला आहे. रिचर्ड गियरने २००७ साली एका कार्यक्रमात शिल्पाला किस केले होते.

शिल्पाची ही पिटिशन जज एस. सी. जाधव यांनी फेटाळली आहे. राजस्थानमध्ये एड्स जनजागृतीसाठी २००७ साली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेअर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, रिचर्ड गेअरने सगळय़ांसमोर शिल्पाला किस केले होते. त्याच्या या कृतीमुळे मोठा वादंग निर्माण झाला. त्यानंतर या प्रकरणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

कोर्टात जेव्हा यावर सुनावणी झाली तेव्हा शिल्पाने तिच्यासाठी देखील गेअरची ती कृती खूपच अनपेक्षित आणि अचानक असल्याचे तिने सांगितले होते. सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पावर जयपूर, अलवर आणि गाझियाबाद येथे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंटही काढले होते. पुढे हे प्रकरण राजस्थान न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. सुनावणीनंतर अखेर १५ वर्षांनी जानेवारी २०२२ मध्ये शिल्पाला एका प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच भेटीत पल्लवीने विवेकला समजले होते गर्विष्ठ, मात्र पुढे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींमध्ये फुलली प्रेमकथा

हे देखील वाचा