‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’, शिल्पा शेट्टीचा मालदीवमध्ये दिसला बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज


शिल्पा शेट्टीला बॉलिवूडच्या फिट आणि दिग्गज अभिनेत्रींमध्ये गणले जाते. शिल्पा शेट्टीचा फिटनेस हा सर्वांसाठीच चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असणारी शिल्पा नेहमीच तिच्या विविध पोस्टमुळे फॅन्सचे लक्ष वेधून घेत असते. याच माध्यमातून ती तिच्या फॅन्ससोबत संवाद देखील साधताना अनेकदा दिसत असते. शिल्पाला फिरण्याची भलती हौस आहे. नेहमी ती तिला मोकळा वेळ मिळाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला निघते.

सध्या शिल्पा तिच्या नवरा राज कुंद्रा आणि परिवारासोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने तेथील तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. शिल्पाने नुकताच तिचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यात ती ऍनिमल प्रिंट असणाऱ्या टू पीस बिकिनीमध्ये बीचवर बसून पोज देताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, ” असे वाटत आहे की मनात तरंग उठत आहे.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिल्पाचा अंदाज, बॉडीलँग्वेज, सर्वानाच खूप आवडत आहेत, तशा प्रतिक्रिया देखील तिला मिळत आहे. कलाकार देखील शिल्पाच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत आहे. तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे.

शिल्पाने या व्हिडिओ आधी डॉल्फिन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओवर देखील सर्वानी खूप लाइक्स आणि कमेंट्स केल्या होत्या.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती १३ वर्षांनी चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहे. लवकरच ‘हंगामा २’ या सिनेमात मीजान जाफरी आणि परेश रावलसोबत दिसणार आहे. याशिवाय ती ‘निक्कमा’ या सिनेमात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि शर्ले सेतिया यांसोबत झळकणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.