सध्या सर्वत्र राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी ही दोनच नावं आपल्याला ऐकायला मिळत आहे. पॉर्नोग्राफी सिनेमा प्रकरणी राज कुंद्राला अटक काय झाली की मीडियामध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त या दोघांची नावे दिसायला लागली. सोशल मीडिया, टीव्ही, वृत्तपत्रे सर्वत्र फक्त शिल्पा आणि राज झळकलेले पाहायला मिळत आहे. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत असताना, मीडिया राज कुंद्रासोबतच शिल्पा शेट्टीबद्दलही वेगवेगळ्या बातम्या दाखवत आहे.
या सर्व बातम्या आणि मीडिया कव्हरेज पाहून शिल्पा शेट्टीने २९ जुलै २०२१ ला २९ मीडिया हाऊस विरोधात कोर्टात मानहानीची तक्रार दाखल केली होती. ३० जुलै रोजी या तक्रारींवर कोर्टात सुनवाई झाली. यावेळेस कोर्टाने शिल्पाची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने त्यांच्या निर्णयात सांगितले की, “तपासाशी संबंधित माहिती लिहिणे किंवा तो प्रसारित करणे बदनामीकारक नाही. पण, एखाद्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा त्यांच्या मुलांच्या संगोपनाबद्दल मीडियाने कोणतीही स्वतःची प्रतिक्रिया देऊ नये.” (Shilpa Shetty Defamation Case demands of the actress were rejected by the High Court)
न्यायालयाने सांगितले की, “शिल्पा शेट्टीच्या खासगी बाबींचा हक्क अबाधित ठेवावा लागेल. या सर्व प्रकरणात शिल्पाची मुले आणि त्यांचे संगोपन याबद्दल कोणाला काहीही बोलता येणार नाही. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पाच्या वकिलाला विचारले की, जर माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या चालवत असतील तर ते चुकीचे आणि बदनामीकारक आहे का? न्यायालयाने शिल्पाच्या वकिलांना सांगितले की, तुमच्या अशिलाच्या पतीविरोधात एक खटला चालू आहे आणि हे कोर्ट त्यात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही. मग तुमचा अशील कुणीही असला तरी. सोबतच त्यांनी सांगितले आपल्या देशात पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य आहे. सोबतच आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील आहे. पत्रकारिता ही जबाबदारीपूर्णच असायला हवी, मात्र त्यात कोर्ट कोणतेही निर्देश देऊ शकत नाही.”
एका बॉलिवूड वेबसाईटचा संदर्भ देत कोर्टाने म्हटले की, “मीडियाचा थेट संबंध राज कुंद्राविरुद्ध सुरू असलेल्या तपासाशी आहे. अहवाल सांगतो की, शिल्पावर पुरावे नष्ट करण्याचा संशय आहे. हा अहवाल तपास एजन्सीच्या समजुतीने लिहिला गेला आहे, असे प्रथमदर्शनी वाटत आहे. हे वार्तांकन शिल्पाच्या निर्दोषपणावर किंवा तिच्या अपराधावर नसून ते पोलिसांच्या निरीक्षणावर बेतलेले आहे,” असे कोर्टाने सांगितले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?
-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप
-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी