बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दिवसात खूप चर्चेत आहे. कधी ती तिच्या अजब हेयरस्टाइलमुळे चर्चेत येते तर, कधी ती कुत्र्यांसोबत फोटोग्राफी करताना दिसते. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि सतत तिचे सोशल मीडिया अपडेट करत असते. ती नेहमी आपल्या पोस्टने चाहत्यांना प्रभावित करत असते. तसेच ती सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंडस खूप फॉलो करत असते. पण ती यावेळी सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करण्यात अयशस्वी झाली आहे. ज्याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले असून, सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टी इंस्टाग्रामवर खूप सक्रीय असते. अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅन्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या चेहऱ्याचे हावभाव इमोजीशी जुळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तिला ते इमोजी कॉपी करण्यात अपेक्षित यश येत नाही. व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने लिहिले की, “मला धक्का बसला आहे, मी संकटात आहे! मला जेव्हा ट्रेंड समजला नाही, तेव्हा रिल्स बनवून काय उपयोग. यासोबत तिने अनेक इमोजीही शेअर केल्या आहेत.”
शिल्पा नेहमी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असते. अशातच तिने काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील कुत्र्यांसोबत फोटो काढताना दिसली होती. हे फोटो पाहून तिचे काही चाहते तिला प्राणीप्रेमी म्हणत आहे तर, दुसरीकडे तिच्या या फोटोंमधील पोज पाहून तिला राज कुंद्राचे नाव घेऊन ट्रोल करण्यात आले होते.
तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अलीकडेच हंगामा २ मध्ये दिसली होती. खूप वर्षानंतर ती मोठ्या पडद्यावर परतली असून, लवकरच ती ‘निक्कामा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासनी आणि शर्ले सेतिया सोबत मुख्य भूमिका निभावताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भर गर्दीत ‘मन्नत’च्या बाहेर हनुमान चालीसाचा जप करताना दिसले पंडितजी, पाहा व्हिडिओ
-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना
-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत
-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी