Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टीने खरेदी केला आयफोन १३, फोन फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडिओ

शिल्पा शेट्टीने खरेदी केला आयफोन १३, फोन फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडिओ

बाॅलिवूड लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पाॅर्नग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अटक केली होती. परंतू, सोमवारी (२१सप्टेंबर) राजला मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जेव्हा राज तुरुंगात होता त्यावेळी शिल्पाला खूप कठीण काळातून जावे लागले. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत असून, शिल्पादेखील यासर्व प्रकारातून बाहेर पडताना दिसत आहे. शिल्पा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. अनेकदा चाहते तिच्या फोटोवर कमेंट करत असतात.

काही दिवसांपूर्वी नुकतीच तुरुंगातून राजची सुटका झाल्यावर तो घरी परतला आहे. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा प्रचंड उत्साही दिसत आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरं तर हा व्हिडिओ काही क्षणाचा आहे. परंतु, हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा खूप आनंदी दिसत असून, तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या व्हिडिओत शिल्पाच्या हातात आयफोन दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने लिहिले की, “माझ्या आयफोन १३ वर मी खूप इंप्रेस झाली आहे. हा खरोखरच बोटाच्या स्पर्शाचा सिनेमॅटिक अनुभव आहे.” या व्हिडिओ आतापर्यंत १५ लाखाहून अधिक लोकांना पाहिला आहे, आणि या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की,“ कुंद्राने घेऊन दिला आहे काय?” तर दुसर्‍या युजरने लिहिले की,“दो नंबरच्या कमाईतील पैसा.”

दरम्यान, जेव्हा राज पाॅर्न व्हिडीओ प्रकरणात अडकला तेव्हा शिल्पा बरेच दिवस खूप नाराज होती. तिने अनेकदा सोशल मीडियावर तिची नाराजी व्यक्त केली. शिल्पाला अनेकदा राजविषयी प्रश्न विचारण्यात आले. परंतु, तिने अनेकदा उत्तर देणे टाळले.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा