बॉलीवूडची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पा नेहमी तिच्या खाण्याचे, रेसिपीचे व्हिडिओ तसेच योगा व्हिडिओ, हॉलिडे फोटो, इतर अपडेट आदी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारी शिल्पा नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते.
सध्या शिल्पा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. शिल्पाने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला आहे. वीकएंड आल्याने सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांचेच काहींना काही प्लन्स आखलेले असतातच. त्याला शिल्पा देखील अपवाद नाहीच. तिने तिच्या नवीन व्हिडिओमधून तिच्या वीकएंड वाइब्सची झलक दाखवली आहे. अतिशय आगळया वेगळ्या लूकमधली शिल्पा जबरदस्त ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या लूक्ससोबतच तिचा अंदाजही बदलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, ” शुक्रवारच्या रात्रीसाठी आशावादी”.
पण इथेच खरी गंमत आहे. दिसते तसे नसते, या व्हिडिओमध्ये जरी शिल्पा दिसत असली तरी ती शिल्पा नाही. आता तुम्ही म्हणाल काय गोंधळात टाकता राव. शिल्पा आहे पण आणि नाही पण, मग नक्की शिल्पा आले की नाही?
थांबा थांबा या व्हिडिओत जरी शिल्पा दिसत असली तरी हा व्हिडिओ पॉप सिंगर रिहानाचा आहे. हा व्हिडिओ नीट पहिला तर तुमच्या लक्षात येईल शिल्पाने रिहानाच्या ‘दिस इज व्हाट यू केम फॉर’ या सुपरहिट गाण्यातील रिहानाच्या चेहऱ्यावर तिचा चेहरा फोटोशॉप केला आहे. रिहानाचे हे गाणे २०१६ साली प्रदर्शित झाले होते.
शिल्पाचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तिला इंस्टाग्रामवर जवळपास १९ मिलियन पेक्षा जास्त लोकं फॉलो करतात. शिल्पा टीव्हीवर अनेक डान्स शोमध्ये जज म्हणून देखील दिसत असते. शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तिचे दोन सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहे. एक आहे सब्बीर खान यांचा ‘निकम्मा’ चित्रपट यात ती अभिमन्यु दासानी आणि शर्ली सेतिया सोबत दिसणार आहे तर दुसरा सिनेमा आहे हंगामा २ परेश रावल, मिजान आणि प्रणिता सुभाष यांच्यासोबत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.