बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकापासून नामांकित अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हीने आपल्या करिअरमध्ये खूप गाजवणारे चित्रपटे दिली आहेत. आजही तिचा आधीपेक्षा जास्त चाहता वर्ग आहे. ती आजही तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ती सोशल मीडियवर खूप सक्रिय असते. शिल्पाचे योगासन करतानाचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात आणि यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता तिने तिच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ती या व्हिडिओमध्ये खूपच उत्सुक दिसत आहे चला तर जाणून घेउया की काय आहे उत्सुक चातेचे रहस्य.
शिल्पा शेट्टी( shilpa shetty ) हीने सोशल मीडियावर तिचा मुलगा वियान याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. वियान सध्या 10 वर्षाचा असून त्याने त्याचा वेगळाच बिजनेस सुरु केला आहे. शिल्पाने व्हिडिओ शेअर करत त्याच्या स्टार्टअप बद्दलची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राज कुंद्रा ( Raj kundra ) चा मुलगा कस्टमाइज फ्लॅान्ट बुट बनवत आहे, जे आपल्या आईसाठी डिझाइन केले आहे. शिल्पा आणि राज यांची मुले एवढ्या लहान वयात एवढी मोठी कामगिरी बजावत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये शिल्पाने याची किंमत 4999 एवढी सांगितली आहे. यासाठी शिल्पाला खूपच अभिमान वाटत आहे आणि तिने शेअर करत लिहिले आहे, “माझा मुलगा वियान राज याचा पहिला युनिक बिजनेस वेंचर जो की कस्टमाइज बुट बनवत आहेत. छोट्या मुलांच्या स्वप्नांना नेहमी प्रोत्साहित केले पाहिजे, हे कौतुकास्पद आहे की एवढ्या छोट्या वयात काही हिस्सा सामाजिक कारणासाठीही दान करण्याचे वचन दिले आहे, शुभेच्छा माझ्या मुलांनो.”
शिल्पाच्या या व्हिडिओवर नेटकरी आणि सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकजन वियानच्या कामगिरीवर त्याची प्रशंसा करत आहेत तिथेच फरहान खान यानेही विहानची प्रशंसा करत त्याच्या कौशल्याला पुढाकार दिला आहे. क्षमिता शेट्टीनेही या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले आहे, “प्राउड मावशी.” याच्या व्यतीरिक्त चाहत्यांनीही वियानला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. या पिढीने आश्चर्य चकित केले आहे’ शिल्पा असे म्हणत असून, वियानच्या कॉन्फीडन्सलेवलची चाहतेही भरभरुन प्रशंसा करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
यामुळे टायगर श्रॉफला येतो रणवीर सिंगचा प्रचंड राग; म्हणाला, ‘त्याची बायको…’
मुलगा पाहिजे की मुलगी? बिपाशा बासूने स्पष्टचं सांगितले
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार 100% चित्रपट, नावावरुनच लागली चाहत्यांना उत्सुकता