शिल्पा शेट्टी मागील काही काळापासून सतत चर्चेत आहे. शिल्पा शेट्टीचा पती असणाऱ्या उद्योजक राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात गेल्या १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीवर सतत संकटांचा मारा सुरूच आहे. एकीकडे तिचा नवरा जेलमध्ये आहे तर दुसरीकडे तिच्यावर फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली. संपूर्णपणे संकटांच्या विळख्यात अडकलेल्या शिल्पाने काही काळ स्वतःला आणि तिच्या परिवाराला जगापासून, सोशल मीडियापासून लांब ठेवले होते.
मात्र नुकतेच शिल्पाने ती परीक्षक असलेल्या सुपर डान्सर शोमध्ये पुन्हा येत तिचे काम सुरु केले आहे. सोशल मीडियापासूनही लांब असणाऱ्या शिल्पाने तिची बाजू मांडत एखाद दुसरी पोस्ट वगळता काहीही शेअर केले नव्हते. पण आता शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात काही प्रेरणादायी ओळींसह मजबूत आणि आनंदी राहण्याची गोष्ट लिहिली आहे. (shilpa shetty motivational and emotional post)

तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “विश्रांती न घेता जगा…आपण आपल्या आयुष्यात पॉजचे बटन दाबू शकत नाही. आपला प्रत्येक दिवस मोजला जातो, मग भलेही तो चांगला असो किंवा वाईट. काहीही झाले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ सतत चालत आहे. आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे वेळ. वेळ गमवण्यापेक्षा तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण उत्तम जगा. मी देखील जेवढे माझ्याकडून शक्य आहे तेवढे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जगणार आहे.”
राज कुंद्राला अटक होण्यापूर्वी शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय होती. पण राजला अटक झाली तशी शिल्पा सर्व गोष्टींपासून काही काळ लांब गेली होती. मात्र आता ती पुन्हा हळूहळू का असेना सोशल मीडियावर परतत आहे. या पोस्ट आधी तिने तिचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, “दृढ निश्चय केलेल्या स्त्रीपेक्षा कोणीच जास्त शक्तिशाली नाही.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’
-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात