Wednesday, July 3, 2024

‘बिग ब्रदर’ या रियॅलिटी शोबद्दल शिल्पा शेट्टीने केला मोठा खुलासा, वाचा संपूर्ण प्रकरण

शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) ‘निकम्मा’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान मुलाखतीत अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये चाहत्यांसमोर आणत आहे. अशातच एका मुलाखतीदरम्यान तिने ‘बिग ब्रदर’ या रियॅलिटी शोशी संबंधित एक गुपित उघड केले आहे. खरं तर, अभिनेत्रीने २००७मध्ये ‘बिग ब्रदर’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये सहभागी झालेल्या १४ सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकत शिल्पा या शोची विजेतीही ठरली. शिल्पाने आता या शोशी संबंधित एक गुपित उघड केले आहे.

शिल्पा शेट्टीला ‘बिग ब्रदर’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घ्यायचा नव्हता. या शोदरम्यान शिल्पासोबत एक घटना घडली, ज्यावर संपूर्ण देशाने तिला पाठिंबा दिला. यात सह-स्पर्धक जेड गुडीने (Jade Goody) शिल्पावर कमेंट केली होती. या रियॅलिटी शोच्या दिवसांची आठवण करून देताना शिल्पा म्हणाली, “मी दोन एपिसोड पाहिले होते आणि जे पाहिले ते पाहून घाबरले होते.” शिल्पाच्या म्हणण्यानुसार, ती इतकी घाबरली होती की, तिने हा शो करण्यास नकार दिला. पण, शोच्या निर्मात्यांशी शिल्पाचा करार अतिशय कडक होता. याच कारणामुळे शिल्पा शो सोडू शकली नाही. असे असतानाही शिल्पाच्या आईने तिला स्पष्टपणे सांगितले होते की, “आपण भारतीय आहोत आणि आपण असे कृत्य करू शकत नाही.” (shilpa shetty reveals about reality show big brother)

पुढे काय म्हणाली शिल्पा?
‘बिग ब्रदर’ या रियॅलिटी शोबद्दल शिल्पाने पुढेही सांगितले. ती म्हणाला, “मला वाटले होते की लोक मला दुसऱ्या आठवड्यातच शोमधून काढून टाकतील. दर आठवड्याला माझे नाव नॉमिनेट होते, पण मी वाचले. मी विचार करत होते की, हे कसे चालले आहे? त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात मला कळाले की, मला सपोर्ट करणारे अनेक भारतीय आहेत. त्यांच्या मतांमुळेच मला ट्रॉफी मिळवता आली.”

शिल्पा शेट्टी लवकरच ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत शर्ली सेटिया आणि अभिमन्यू दासानी देखील दिसणार आहेत. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा