Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेव्हा शिल्पा शेट्टीच्या गळ्याचा फास बनला तो ‘चुम्मा’, यूपीपासून बिहारपर्यंत उडाली होती खळबळ

‘एक चुम्मा तू मुझको उधार दे दे और बदले में यूपी बिहार ले ले…’ असा्च् एक ‘उधार घेतलेला चुम्मा’ शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) गळ्यात अडकले. समाजप्रबोधन करण्यासाठी ती बाहेर पडली, तेव्हा ती स्वतःच एका वादात अडकली होती. हे प्रकरण २००७ सालचे आहे, जेव्हा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने (Richard Gere) शिल्पा शेट्टीला सर्वांसमोर किस केले होते. इतकेच नव्हे, तर तो शिल्पा शेट्टीला सतत किस करत होता. त्यानंतर बराच गदारोळ झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी शिल्पा शेट्टीला कडाडून विरोध केला. एका किसमुळे ती कायदेशीर लढाईत अडकेल, याची कल्पनाही शिल्पा शेट्टीने केली नसेल. पण तसं झालं आणि प्रकरण दीड दशक चाललं.

नेमकं काय झालं होतं?
साल २००७मध्ये शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे एकत्र दिल्लीत एड्स जनजागृती कार्यक्रमात पोहोचले होते. इथेच रिचर्डने सार्वजनिक ठिकाणी शिल्पाला मिठी मारून किस केले. आधी तो शिल्पाचा हात धरत स्टेजवर पोहोचला. त्यानंतर त्याने तिला मिठी मारली आणि यादरम्यान अचानक किसिंगला सुरुवात केली. यानंतर या प्रकरणाला चांगलाच वेग आला. शिल्पा शेट्टीवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, कट्टरपंथी हिंदू संघटना आणि गटांनी या किसिंग सीननंतर खूप विरोध केला. हा भारतीय मूल्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले होते. (shilpa shetty richard gere connection case)

पंधरा वर्षांनी प्रकरणातून मिळाली मुक्तता
अभिनेत्रीवर अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तब्बल १५ वर्षांनंतर यावर्षी जानेवारीत त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याचे सार्वजनिक ठिकाणी किस घेतल्याप्रकरणी न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली. २००७ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर राजस्थानमध्ये दोन आणि गाझियाबादमध्ये अश्लीलतेच्या आरोपाखाली दोन आणि गाझियाबादमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१७ मध्ये हे प्रकरण मुंबईला हस्तांतरित करण्याच्या तिच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांच्या कोर्टाने १८ जानेवारी २०२२ रोजी शिल्पा शेट्टीची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर सविस्तर आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार शिल्पाने घटनेनंतर लगेचच आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणाचा विचार केल्यानंतर शिल्पावरचे आरोप निराधार असल्याचे समोर आले आणि त्यामुळे तिची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

रिचर्डला माफी लागली मागावी
या प्रकरणाला गती आल्याचे पाहून अभिनेते रिचर्ड गेरेने माफी मागितली. किस घेणे ही सुरक्षित गोष्ट आहे, त्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या घटनेनंतर रिचर्ड गेरेविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले, जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा