बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी शिल्पा शेट्टी इतर कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी जोडलेली आहे. ती नेहमीच आपल्या आलिशान बंगल्यातून फोटो, व्हिडिओ पोस्ट करते. मग तो व्हिडिओ तिच्या फीटनेसचा असो किंवा मग कुकींगचा. शिल्पाचा बंगला मुंबईच्या जुहू येथे आहे. तिच्या बंगल्याचे नाव ‘किनारा’ आहे. लॉकडाऊनदरम्यान शिल्पा पती राज कुंद्रा, मुलगा वियान आणि मुलगी समीषासोबत वेळ घालवताना दिसली आहे. चला तर मग शिल्पाच्या या शानदार बंगल्याबद्दल फोटोंमधून जाणून घेऊया.
शिल्पाचा बार आणि डायनिंग एरिया पाहुण्यांसाठी आणि पार्टींसाठी एकदम परफेक्ट आहे. शिल्पाच्या गरात लॉंग वुडेन डायनिंग टेबल आहे. सोबतच भिंतीवर अनेक पेंटिंग्स लावले आहेत. डायनिंग एरिया आणि लिविंग एरियामध्ये ग्लास डोअर लावण्यात आला आहे.
शिल्पाच्या घराचा बाकी भाग जिथे बोल्ड कलरमध्ये आहे, तर बेडरूममध्ये फिक्कट रंग लावण्यात आला आहे. ऑफ व्हाईट भिंतीच्या रंगासह मॅचिंग बेडही आहेत. बेडरूमचा फ्लोअर हा वुडेन आहे.
घरातील किचनला मॉडर्न लूक देण्यात आला आहे. शिल्पाच्या घरातील किचनचा रंग काळा आणि ग्रे आहे. सोबतच मॉड्यूलर फिनिशिंगही आहे. किचनमध्ये जेवण बनवताना शिल्पा नेहमी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
घराच्या बालकनीच्या बाहेर हिरवळ आहे. तिथे खूप सारे झाडे आहेत. बालकनी खूप मोठी असून तिथे हिरव्या रंगाची खुर्ची ठेवण्यात आली आहे, तर फ्लोअर पॅटर्नमध्ये आहे.
CHECK OUT !! Shilpa Shetty Kundra's Luxurious Bungalow! – https://t.co/zCqyXvRaHV pic.twitter.com/wrNwim6fRB
— FB Bollywood (@FB_Bollywood) July 6, 2016
शिल्पाला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल, तर तुम्ही तिच्या घराचा हा भाग नक्कीच पाहिला असेल. शिल्पा येथे योगा करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. घराच्या या भागात ऍथनिक लूक देण्यासाठी मोठ्या साईजचा दगड लावण्यात आला आहे. येथील फ्लोअरला संगमरवरची फिनिशिंग आहे. बसण्यासाठी सिटींग एरियादेखील आहे. साधारणत: व्हिडिओच्या सुरुवातीला शिल्पा येथेच बसलेली दिसते.
फीटनेस फ्रीक असणाऱ्या शिल्पाच्या घरात जिमची व्यवस्थाही आहे. ती येथे आपला मुलगा वियानसोबत व्यायाम करताना दिसते. तिच्या बंगल्याची विशेष बाब अशी की, बंगल्याच्या वास्तुचीही काळजी घेण्यात आली आहे.
घराच्या गार्डनमध्ये बुद्धांची मोठी मूर्ती लावण्यात आली आहे. शिल्पा नेहमी या गार्डनमध्येही योगा करताना दिसते. सोबतच काही अनेक मूर्तीही येथे ठेवण्यात आल्या आहेत.
गार्डनमध्ये वेगळ्या प्रकारच्या फळभाज्या लावण्यात आल्या आहेत. येथे फळांच्या झाडांखाली बसण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाकही आहेत. घरात बनलेल्या गार्डनमधून समुद्र अगदी स्पष्टपणे दिसते.
शिल्पा आपल्या घरामध्ये पूजा करतानाही दिसते. गणेश चतुर्थी असो किंवा दिवाळी, ती नेहमी सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो शेअर करत असते.