Thursday, July 18, 2024

शिल्पा शेट्टीने डान्स काय शिकवला लेखक मनोज मुंतशीर झाले डान्स रोमियो, व्हिडिओ झाला व्हायरल

टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील सध्या सर्वात जास्त गाजत असणारा रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियाज गॉट टॅलेंट’. सोशल मीडियावरही या शोचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. शोमध्ये संपूर्ण देशातून आलेले अतिशय प्रतिभावान स्पर्धक सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या शोच्या नवनवीन भागात शिल्पाचे नवनवीन लूक आणि अंदाज पाहायला मिळत आहे. शिल्पा या शोच्या सेटवर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करते आणि सोशल मीडियावर शेअरही करते तिचे हे व्हिडिओ देखील खूपच चर्चेत येतात. पुन्हा एकदा शिल्पाचा नवीन व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा तिच्या सोबतचे परीक्षक असणाऱ्या मनोज मुंतशीर आणि बादशाह यांना डान्स शिकवताना दिसत आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ सोनी चॅनेलने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसे पाहिले तर मनोज मुंतशीर यांचा दूरदूरपर्यंत डान्ससोबत कोणताच संबंध नाही. मात्र शिल्पाला स्टेजवर पाहून मनोज यांना देखील नेहमीच डान्स करावासा वाटत असतो. शिल्पा मनोज यांना डान्स शिकवताना अतिशय सोप्या स्टेप्स सांगते आणि मनोज त्या सहजपणे करतात देखील. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहे.

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये या आठवड्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर पाहुणे म्हणून येणार आहे. हे दोघं त्यांचा ‘जर्सी’ हा सिनेमा प्रमोट करताना दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल यांचे या शोच्या सेटवरचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी शाहिद आणि मृणाल यांचा शिल्पा शेट्टीसोबतचा ‘तू मेरे अगल बगल है’ गाण्यावरील एक फनी डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हे सर्व फनी डान्स करताना दिसले.

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने बऱ्याच काळानंतर ‘हंगामा २’ सिनेमातून चित्रपटांमध्ये कमबॅक केले होते. मात्र हा सिनेमा खास चालला नाही. आता लवकरच ती ‘निक्कमा’ सिनेमात दिसणार असून, हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा