Tuesday, July 9, 2024

‘यातील राज कुंद्रा कोणता?’ शिल्पा शेट्टीच्या कुत्र्यासोबत मजेशीर पोझ बघून युजर्सने केले कमेंट्सचा भडीमार

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेसमुळे आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असते.‌ तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही. सोशल मीडियावर शिल्पा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. काहींना तिचा अंदाज आवडतो, तर काहीजण मात्र तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात. अशातच शिल्पा शेट्टीने रस्त्यावरील कुत्र्यांसोबत काही फोटो काढले आहेत. या नंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेकजण तिचा पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टी यांची नावे घेऊन तिला ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. तिने रस्त्यावरील कुत्र्यांसोबत फोटो काढले आहेत. हा फोटो पाहून अनेकजण तिला ऍनिमल लव्हर म्हणत आहेत, तर काहीजण या फोटोवर खूप प्रेम दर्शवत आहे.अनेकजण तिची पोझ बघून तिला राज कुंद्राच्या नावाने ट्रोल करत आहेत. (Shilpa Shetty troll after poses with street dog’s trolls says which one is raj Kundra)

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, शिल्पा रस्त्यावरील कुत्र्यांसोबत बसली आहे. त्यांच्यासोबत फोटो काढताना ती मजेशीर पोझ देत आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शिल्पाचे फोटो शेअर केले आहे. हा फोटो पाहून अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “राज कुंद्राला देखील शिकव”, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “यात राज कुंद्रा कोण आहे?” एकाने तर तिला कमेंट केली आहे की, “तुझ्या बहिणीला तू काही शिकवत का नाही?.” अशाप्रकारे या पोस्टवर कमेंट्सचा भडीमार चालला आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा मागील काही दिवसांपासून अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी जेलमध्ये होता. त्यामुळे शिल्पा शेट्टी खूपच चर्चेत आली होती. तसेच शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या ‘बिग बॉस १५’ मध्ये आहे. त्यामुळे ती देखील खूप चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पा शेट्टी पारंपरिक वेशभूषेत झाली करवाचौथसाठी झाली तयार, परंतु पती राज कुंद्रा आहे तरी कुठे?

-राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

-मोठी बातमी! राज कुंद्राकडून शर्लिन चोप्रावर ५० कोटी रुपयांचा खटला दाखल; म्हणाला, ‘शिल्पाला फोन करून…’

हे देखील वाचा