बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी ती तिच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, तर कधी सुट्टीतील फोटो शेअर करते. तसेच चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या मालमत्तेमुळे देखील चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत आहे. यंदा तिने ४७व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आपल्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल माहिती दिली. तेव्हापासून अभिनेत्रीचे चाहते तिची व्हॅनिटी व्हॅन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता तिच्या व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून भल्याभल्यांचे होश उडाले. शिल्पा शेट्टीची व्हॅनिटी व्हॅन लक्झरी घरापेक्षा कमी नाहीये.
अभिनेत्रीच्या व्हॅनिटी व्हॅनचा एक व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय सुविधा आहेत, हे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओनुसार, तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोन वॉश रूम आहेत, तर किचनपासून मीटिंग रूम पण आहे. इतकंच नाही, तर शिल्पा शेट्टीला योगा करण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनचं छतही सुंदर बनवण्यात आलं आहे. (shilpa shetty vanity van is not less than 1 bhk)
खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:
https://www.instagram.com/reel/CgEN7o0qxM5/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या या व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडिओ खूप जोरदार वायरल होत आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. सोबतच व्हिडिओवर कमेंट्स करत व्हॅनिटी व्हॅनचे खूप कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “मुंबईत १ बीएचके फ्लॅट इतका मोठा असतो.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “खूपच सुंदर आहे.” त्याचवेळी तिसर्याने “या व्हॅनिटी व्हॅनची किंमत काय आहे?” असे लिहिले. याशिवाय इतरही अनेक चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट्स करून शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनचे कौतुक केले आहे.
शिल्पा शेट्टीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल तर, काहीदिवसांपूर्वीच ‘इंडियन पुलिस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या सीरिजमध्ये ती दिसली. रोहित शेट्टीच्या सीरिजमध्ये ती महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसली. या सीरिजद्वारे रोहित शेट्टीने ओटीटीवर डेब्यू केले. यात शिल्पासोबत सिद्धार्थ मल्होत्रा व विवेक ओबेरॉय होते. कॉप युनिवर्सच्या माध्यमातून प्रथमच रोहित शेट्टीसोबत काम करत असल्याने सुपर ग्रिल्ड अनुभवत असल्याचंही शिल्पा शेट्टीने सांगितले.
हेही वाचा










