Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड संकटकाळात कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्याचे मागणे घेऊन शिल्पा पोहोचली वैष्णौ देवीच्या दरबारात

संकटकाळात कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्याचे मागणे घेऊन शिल्पा पोहोचली वैष्णौ देवीच्या दरबारात

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर एक भलेमोठे संकट येऊन ठेपले आहे. सध्या राज कुंद्रा हा तुरुंगात असून, त्याचबरोबर त्याच्या अडचणी कमी होण्यापेक्षा आणखी वाढत आहेत. या सर्व संकटातून राज कुंद्राला बाहेर काढण्यासाठी शिल्पा शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. पतीच्या अडचणी कमी होण्यासाठी शिल्पा शेट्टी माता वैष्णो देवीच्या दरबारात तिचे मागणे घेऊन दर्शनासाठी पोहोचली. राज कुंद्राच्या या केसमुळे शिल्पा शेट्टी सध्या खूपच टेन्शनमध्ये आहे. या परिस्थितीतून तिला बाहेर पाडण्यासाठी परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज आहे. यासाठीच शिल्पा राज आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला या मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी नवस मागण्यासाठी वैष्णो देवीला पोहोचली होती.

वैष्णो देवीला पोहोचल्यानंतर माताराणीच्या दर्शनासाठी शिल्पाने घोड्यावर बसून पुढचा प्रवास केला. तिच्यासोबत अनेक पोलीस कर्मचारी देखील दिसले. प्रवासादरम्यान तिने ‘जय माता दी’ चा जप ही केला. त्याचबरोबर तिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “दर्शन घेतल्याने तिला खूप आनंद झाला.”

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी बुधवारी १६ सप्टेंबर रोजी जम्मू -काश्मीरच्या कटरा येथे पोहचली. यादरम्यान शिल्पा शेट्टी घोड्यावर स्वार होत असताना तिने मंदिराच्या आवारात भक्त आणि माध्यमांशी संवादसुद्धा साधला. जम्मू -काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराला भेट देण्यासाठी तिने १३ किमीचा प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.

शिल्पा शेट्टीचा देवावर खूपच विश्वास आहे. अलीकडेच तिने आपल्या घरी दरवर्षीप्रमाणे गणपतीची स्थापना केली होती. गणेश उत्सवाचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. शिल्पाचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवून अँपवर स्ट्रीम केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

सध्या, मुंबई गुन्हे शाखेने मॅजिस्ट्रेट कोर्टात राज कुंद्राविरोधात १,५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने एप्रिल महिन्यात या प्रकरणी ९ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना १९ जुलै रोजी अटक करण्यात आली.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा