Monday, July 1, 2024

शिल्पा शेट्टी पुन्हा अडचणीत, ईडीने केला पती राज कुंद्राविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर (shilpa shetty) संकटांचा डोंगर कोसळला आहे. याआधी मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात (raj kundra) गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज कुंद्राविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे. हे प्रकरण ईडीने मुंबई पोलिसांच्या केसवर आधारित आहे जिथे त्याच्या विरोधात पोर्नोग्राफी अॅपशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज यांच्यावर पॉर्नोग्राफी अॅप चालवल्याचा आरोप आहे. ईडीने राज कुंद्रा आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता राज कुंद्रासह या आरोपींना ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात येणार आहे. सध्या ईडी अधिक माहिती गोळा करण्यात गुंतले आहे. तपास यंत्रणा सध्या राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसांनी मड आयलंडमधील एका बंगल्यावर छापा टाकला आणि पॉर्न फिल्म बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी कुंद्राचे नाव घेतले आणि त्याला अटक करण्यात आली. नंतर त्यांनी राजची जामिनावर सुटका केली. कुंद्रा म्हणाला की, त्याच्याविरुद्ध जाणीवपूर्वक तपास करण्यात आला होता आणि त्याचा त्या गुन्ह्याशी संबंध असल्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत. मात्र, त्यानंतरही त्याला काही महिने तुरुंगात काढावे लागले. राज कुंद्रावर पैशासाठी सोशल मीडिया अॅप्सवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप होता. कुंद्राचा यूकेस्थित केनरिनमध्ये स्टेक असल्याचा आणि अश्लील साहित्य निर्मिती आणि वितरणात गुंतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

नुकताच शिल्पा शेट्टीच्या ‘निकमा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आता या प्रकरणाचा शिल्पाच्या चित्रपटावर परिणाम होणार का हे पाहावे लागेल. कारण गेल्या वेळी जेव्हा मुंबई पोलिसांनी शिल्पावर गुन्हा दाखल केला तेव्हा अभिनेत्रीने तिचे काम अर्धवट सोडले होते. ती एका डान्स रिअॅलिटी शोला जज करत होती. मात्र, काही महिन्यांनंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर ती कामावर परतली. राज बाहेर आल्यावर त्यांनी शिल्पा वैष्णोदेवीचे दर्शन घेतले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा