Saturday, June 21, 2025
Home अन्य लॉकडाऊनने खराब केली ‘अंगूरी भाभी’ची अवस्था, अभिनय सोडून दिसली दगड फोडताना; व्हिडिओ शेअर करत दिला ‘हा’ सल्ला

लॉकडाऊनने खराब केली ‘अंगूरी भाभी’ची अवस्था, अभिनय सोडून दिसली दगड फोडताना; व्हिडिओ शेअर करत दिला ‘हा’ सल्ला

बॉलिवूडमधून काही अशा बातम्या समोर येत असतात, ज्यांना पाहून आपल्याला असं वाटतं की, चित्रपटसृष्टीत केवळ आनंद आणि आनंदच पसरला आहे. कलाकारांना पाहून असे वाटते की, ते खूप ऐशोआरामाचे आयुष्य जगत असतील. दुःख या भावनेशी त्यांचा लांब- लांब पर्यंत काहीही संबंध नसेल. परंतु खरी परिस्थिती कधी- कधी आपल्या कल्पनेच्या पलीकडची असते. मोठ्या पडद्यापासून ते छोट्या पडद्यापर्यंत असे अनेक कलाकार आहे ज्यांना आर्थिक तंगीमधून जावे लागत आहे. ही परिस्थिती कोणावरही येऊ शकते. असेच काही कलाकार या परिस्थितीतून जात आहेत. असंच काहीसं अभिनेत्री शिल्पा शिंदेसोबत घडत आहे. टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील जुनी अंगूरी भाभी म्हणजेच शिल्पा शिंदे या दिवसात खूप चर्चेत आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती लोकांना काम करत राहण्याचा सल्ला देत आहे.

शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या फील्डवरून बाजूला होऊन काम करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती एका कन्स्ट्रक्शन साईटवर हातात ड्रिल मशीन घेऊन काम करताना दिसत आहे. डोक्यावर टोपी आणि कुर्ता घालून शिल्पा तिची सगळी ताकद एकवटून दगड आणि भींत फोडताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने एक कॅप्शन लिहिले आहे की, “लॉकडाऊन झाले त्यामुळे मी कन्स्ट्रक्शन साईटकडे वळले आहे. ज्यांच्याकडे काही काम नाहीये अशा लोकांनी त्यांचं फील्ड चेंज करा. काळानुसार सगळं काही ठीक होईल. फक्त सकारात्मक विचार करत राहा.” हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते खूप हैराण झाले आहेत.

शिल्पा शिंदेचा हा व्हिडिओ पाहून तिचे काही चाहते हैराण झाले आहेत, तर काही चाहत्यांनी तिच्या हिमतीला दाद दिली आहे. कोणी तिला ‘सुपर वूमन’ म्हणत आहे, तर कोणी तिला ‘ऑलराऊंडर’ म्हणत आहे. तिच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “तुम्ही ऑलराऊंडर आहात. देव तुमच्यावर अशीच कृपा दृष्टी ठेवो.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “कोणतेही काम लहान नसते.” तर एका युजरने लिहिले आहे की, “ही खरी शिल्पा शिंदे आहे. एकदम रिअल जशी आहे तशी आहे.”

शिल्पा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 1999 मध्ये टेलिव्हिजनमध्ये पाऊल ठेवले. यांनतर ती काही ‘आये ना जुदाई’, ‘संजीवनी’, ‘मिस इंडिया’, ‘रब्बा इश्क ना होवे’, ‘बेटीया अपना या पराया धन’, ‘हरी मिर्च लाल मिर्च’, ‘वारस’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. पण तिला ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने खूप ओळख दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा