Wednesday, June 26, 2024

लाल रंगाचा टीशर्ट आणि हातामध्ये कुत्र, खूपच रंजक आहे अनुप खेर आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी…

बॉलिवूडमधील लेजंडली कलाकार दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता आणि अभिनेता अनुपम खेर ही जोडी लवकरच आगामी येणारा ‘शिव शास्त्री बल्बोआ’ चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतंच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये नीनाजी लाल रंगाच्या टीशर्ट आणि हातामध्ये कुत्र घेऊन बाइक राइडची मज्जा लुटताना दिसत आहेत, तर अनुपम खेर देखिल हटके स्टाइलमध्ये पाहायला मिळणार आहेत.

इंडस्ट्रीमधील दोन दिग्गज कलाकारांची जोडी एकत्र पुन्हा एकदा पाहाया मिळणार आहे. अजयन वेणुगोपालन (Ajay Venugola) दिग्दर्शित ‘शिव शास्त्री बल्बोआ’ (Shiv Shastri Balboa) चित्रपटामध्ये भारतीय जोडप्यांची कथा दर्शवली आहे, जे अमेरिकेच्या छोट्याश्या गावात राहात असतात. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये दिसून येत आहे की, हा चित्रपट कॉमेडी ड्रामा असणार आहे.

अनुपम खेर आणि नीना गुप्ता (Neena gupta) स्टारर ‘शिव शास्त्री बल्बोआ’ हा चित्रपट एक बॉलिवूड ड्रामा असून येत्या (दि, 10 फेब्रुरवरी 2023) रोजी प्रर्शित होणार आहे. अनुपम खेर यांनी गेल्या आठवड्यातच चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करत लिहिले की, “एका साधारण माणसाची असाधारण व्यक्तीमत्त्वाची कथा सांगणारी ही कथा आहे जी, तुम्हाला हसवेल आणि सोबतच तुमच्या मनात एक सुंदर विश्वासाची भावना निर्माण करेल.”

 

View this post on Instagram

 

‘शिव शास्त्री बल्बोआ’ हा चित्रपट इंग्रजी भाषेत असून नीना गुप्ता आणि अनुपम खेर मुख्य भुमिकेत असणार आहेत. त्यांच्यासोबतच जुगल हंसराज, शारिब हाशमी आणि अभिनेत्री नरगिस फाखरी देखिल महत्वाच्या भूमिकेत पाहाला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजयन वेणुगोपालन केलं असून किशोर वरिथ यांनी निर्मिती केली आहे.

अनुपम खेर आणि नीना गुप्ता या जोडीने सुरज बडजात्य यांच्या उंचाई चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. यामध्ये नीनाजींनी बोमन इरानी यांच्या पत्नीची भूमिका निभावली होती. त्याशिवाय अनुपम खेर आणि बोमन अमिताभ बच्चन यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आईच्या निधनानंतर ‘भाईजान’च्या नावाने राखीनं फोडला हंबरडा, सलमानचं नाव घेत ढसाढसा रडली अभिनेत्री
सनशाइन! रिया चक्रवर्तीचा कातिलाना अंदाज, पाहाच फोटो गॅलरी

हे देखील वाचा