Saturday, June 29, 2024

खरे की काय! सलमान खानच्या सिनेमातून शिव ठाकरे करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

बिग बॉस १६ हा शो यावर्षी तुफान गाजत आहे. शो हिट होण्यासाठी गरजेचं सर्व माल मसाला सध्या बिग बॉसमध्ये असल्याने यावर्षी या शोने अमाप लोकप्रियता मिळवली. हेच पाहून शोला काही वाढीव दिवस देखील मिळाले. यावर्षी शोमध्ये बऱ्याच ओळखीच्या चेहऱ्यांसोबत काही अनोळखी चेहरे देखील होते. या सर्वांमध्ये लोकप्रियता मिळवली ती मराठमोळ्या शिव ठाकरेने. शिवने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी बिग बोस जिंकणाऱ्या शिवची हिंदी बिग बॉसमध्ये एन्ट्री पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांनी त्याला ट्रोल केले मात्र आता हा पठ्या या शोच्या अंतिम फेरीत पोहचला आहे.

लोकांची मने जिंकणाऱ्या शिवने शोचा होस्ट असलेल्या सलमानच्या मनात देखील जागा निवळी आणि सोबतच त्याच्या सिनेमात देखील. हो हो शिव ठाकरेला सलमान खानचा सिनेमा मिळाल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार शिवला सलमानच्या आगामी सिनेमात एक खास भूमिका मिळाली असून, शो संपल्यानंतर शिव शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. शिव सलमानच्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, चित्रपटाचे नाव अजून समोर आलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मात्र सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून तो चित्रपटांमध्ये पदार्पण करू शकतो असे सांगितले जात आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून बिग बॉस १३ ची स्पर्धक शेहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जेव्हा निमृत कौर हलुवालियाला एकता कपूरने ‘लव, सेक्स और धोखा 2’ ऑफर केली होती तेव्हा अशा बातम्या आल्या होत्या की, प्रियंकाला सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमाची ऑफर दिली आहे. आता या सर्व बातम्यांमध्ये किती खरे किती खोटे हे लवकरच समजेल.

तत्पूर्वी लवकरच सलमान खान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सान्मातून दिसणार असून, याचा टिझर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. याशिवाय तो टायगर ३ मध्ये देखील दिसेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोनालिसा आणि पवन सिंग यांच्या ‘या’ जुन्या गाण्याने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, मिळवले मिलियन व्ह्यूज

अनुपम खेर यांना करोडोंची कार सोडून ऑटोमध्ये करावा लागला प्रवास; म्हणाले, ‘काहीही होऊ शकते’

हे देखील वाचा