Wednesday, July 3, 2024

‘दया कुछ तो गडबड है’, म्हणत सीआयडी फेम शिवाजी साटम यांनी आपल्या भूमिकेने पाडली चाहत्यांच्या मनावर छाप, तब्बल 7 चित्रपटात बनले पोलीस

‘दया कुछ तो गडबड है’, ‘दया दरवाजा तोड दो’ हे डायलॉग ऐकताच समोर येतात एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम होय. त्यांनी आपल्या भूमिकेने आपल्या चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. शिवाजी साटम नाव उच्चारताच टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित आणि अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आठवतो तो म्हणजे ‘सीआयडी.’ बुधवारी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. 21 एप्रिल, 1950 रोजी जन्मलेले शिवाजी साटम 70 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्ताने चाहते त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देत आहेत.

शिवाजी साटम यांनी हिंदी, इंग्रजी तसेच मराठी चित्रपटात काम करून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ‘वास्तव’, ‘सूर्यवंशम’, ‘नायक’ अशा 35 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. त्यांनी 1980मध्ये रिश्ते-नाते या लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. यानंतर त्यांनी ‘एक शून्य शून्य’ या यशस्वी मराठी मालिकेतही काम केले. यानंतर त्यांना अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम मिळू लागले होते.

अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करूनही शिवाजी साटम यांनी सीआयडी मालिकेतून अधिक लोकप्रियता मिळविली आहे. एसीपी प्रद्युम्नच्या व्यक्तिरेखेत ते कायम लोकांच्या मनात राहिले आहेत. 1998 पासून ते सीआयडीमध्ये कार्यरत होते आणि आपल्या भूमिकेने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. 2013मध्ये त्यांनी उर्वरित वेळ चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. पण लोकांची मागणी लक्षात घेता सीआयडी मधील एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेत परत आले होते.

अभिनेते शिवाजी साटम यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रवासामध्ये 7 वेळा पोलिसांची भूमिका साकारली आहे. असे म्हणतात की, सीआयडीमध्ये येण्यापूर्वीच एक घटना घडली होती, त्यानंतर ते स्वत: सीआयडी झाले. यापूर्वी शिवाजी साटम यांनी बँकेत काम केले होते. यावेळी एक घटना घडली ज्यामध्ये त्यांना पोलिसांचा सामना करावा लागला. आणि हे प्रकरण सोडवण्यासाठी पोलीस त्यांच्याशी बोलले होते. शिवाजी साटम यांनी हे प्रकरण मिटवले होते.

त्यानंतर शिवाजी साटम अनेक वर्षांपूर्वी सीआयडी मालिकेमध्ये सामील झाले होते, जे पिढ्यान् पिढ्यांसाठी प्रेक्षकांना आवडत असे. बी.पी. सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा कार्यक्रम भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारा कार्यक्रम होता. त्याचा पहिला भाग 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 21 जानेवारी, 1998 रोजी प्रसारित झाला होता, जो सन 2018 पर्यंत चालला. त्याचा शेवटचा भाग 27 ऑक्टोबर 2018 रोजी प्रसारित झाला होता.

सीआयडी हा असा कार्यक्रम होता, जो बालकांपासून ते वृद्धांपर्यंत हा कार्यक्रम सगळ्यांनीच आवडीने बघितला आहे. शिवाजी साटम अलीकडेच कोरोना लस घेताना दिसले. त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. यासोबतच त्यांनी चाहत्यांनाही लस घेण्यास सांगितले आहे. (shivaji satam birthday unknown facts he played policeman character in 7 films cid was the longest running tv show in indiapageid7)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ जगप्रसिद्ध डान्सर, गायक असणाऱ्या कलाकाराचे वयाच्या २५ व्या वर्षी दुःखद निधन

आकांशा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल म्हणाली, ‘मला काही झाल्यास त्याला जबाबदार…’

हे देखील वाचा