Friday, July 5, 2024

टेलिव्हिजनवरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला झाले किडनी इन्फेक्शन, पोस्ट शेअर करत स्वतः दिली माहिती

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेली शिवांगी जोशी सध्या तिच्या नवीन शोमध्ये खूपच गाजत आहे. मात्र यातच आता तिच्या संबंधित एक काळजी करणारी बातमी समोर येत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायरा ही भूमिका साकारून शिवांगीला अमाप लोकप्रियता मिळाली. अनेक वर्ष ती या मालिकेत दिसली या मालिकेनंतर तिने बरेच शो केले. आता तिच्या तब्येतीबद्दल एक बातमी समोर येत आहे. स्वतः शिवांगीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.

झाले असे की शिवांगी जोशीला किडनी इन्फेक्शन झाले आहे. यावर उपचार घेण्यासाठी ती सध्या रुग्णालयात ऍडमिट आहे. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यासोबतच तिने तिचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये देखील तिने स्वतःला सकारत्मक ठेवत ओकेचे साइन दिले आहे. यात ती हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली असून, हसत पोज देत आहे.

हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “सर्वांना हाय, मागील काही दिवसांपासून माझ्या किडनीमध्ये इन्फेक्शन झाले आहे. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे कुटुंब, मित्र, डॉक्टर आणि हॉस्पिटमधील सर्व कर्मचारी मुख्य म्हणजे देवाच्या कृपेमुळे मी आता बरी होत आहे. ही मी तुम्हाला देखील सांगू इच्छिते की, आपल्या शरीराला, डोक्याला आणि आत्म्याला अराम द्या. त्याची काळजी घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवा. सर्वांना खूप प्रेम. मी लवकरच बारी होईल आणि परत येईल.”

दरम्यान शिवांगीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेनंतर ‘बालिका वधू 2’ आणि ‘खतरों के खिलाड़ी 12’ मध्ये ती दिसली होती. आता लवकरच शिवांगी जोशी ‘बेकाबू’ या शोमध्ये दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत ईशा सिंह, शालीन भनोट आणि मोनालिसा मुख्य भूमिकेत आहेत. हा शो १८ मार्च पासून कलर्सवर चालू होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत, कलाकारांकडून काळजी घेण्याचं आवाहन
‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली….,

हे देखील वाचा