Friday, August 1, 2025
Home मराठी शिवानी बावकरने धरला ‘मेरा यार’ स्टेप्सवर ठेका, स्टाईलिश लूकने घातली चाहत्यांना भुरळ

शिवानी बावकरने धरला ‘मेरा यार’ स्टेप्सवर ठेका, स्टाईलिश लूकने घातली चाहत्यांना भुरळ

मराठी चित्रपटसृष्टीतील आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. शिवानीने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिर झालं जी‘ मध्ये मुख्य भूमिकेत काम केले होते. यानंतर महाराष्ट्रातील घराघरात ती लोकप्रिय झाली आहे. खरंतर ही शिवानीची पहिलीच मालिका होती पण तिचा उत्कृष्ट अभिनय आणि संवाद कौशल्याने तिने सर्वांचेच मन जिंकून घेतले होते. या मालिकेत तिने शीतल हे पात्र साकारले होते. शिवानी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

शिवानीने (shivani baokar) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, ती ‘मेरा यार’ या गाण्यावर सोशल मिडिआवरील ट्रेंडिंग स्टेप्स फॉलो करत आहे. तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तिचा लूक देखील एकदम स्टाईलिश दिसत आहे. (shivani baokar share her dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने “नवे वर्ष नवी रील,” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या गाण्यावर अनेक कलाकारांनी व्हिडिओ केला आहे. त्यामुळे आता शिवानी तरी कशी या ट्रेंडमध्ये मागे राहील. तिचा व्हिडिओमधील लूक आणि हावभाव सगळ्यांना खूप आवडला आहे.

शिवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘लागिर झालं जी’ या मालिकेत काम केले आहे. त्यानंतर तिने ‘उंडगा’ आणि ‘युथ ट्यूब’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच तिने काही म्युझिक व्हिडिओ मध्ये देखील काम केले आहे. तसेच सध्या ती सोनी मराठीवरील ‘कुसुम’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे पात्र देखील सगळ्यांना खुप आवडत आहे.

हेही वाचा :

बिग बॉस १५: देवोलीना भट्टाचार्जीच्या मते तेजस्वी प्रकाश आहे अस्वच्छ, म्हणाली ‘ती ब्रशशिवाय…’

फरहान अन शिबानी यांची मार्चमधील लग्नाची तारीख पुन्हा रद्द, ‘या’ खास प्रसंगी घेणार सात फेरे,

राज कुंद्रासोबत पुन्हा दिसली शिल्पा शेट्टी, पतीसोबत पोहोचली साईबाबांच्या दरबारात, पाहा व्हिडिओ

 

 

हे देखील वाचा