मराठी टेलिव्हिजनवर अनेक नवीन मालिका येत आहेत. झी मराठी या वाहिनीवर देखील अनेक नवीन मालिका आल्या आहेत. अशातच सोनी मराठी या वाहिनीवर देखील एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील दोन दिवसांपासून टीव्हीवर आणि सोशल मीडियावर एका मालिकेचा प्रोमो झळकत आहे. या प्रोमोमध्ये सर्वांची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षक ही मालिका बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
शिवानीच्या नवीन मालिकेचे नाव ‘कुसुम’ असे आहे. या प्रोमोमध्ये शिवानीसोबत अभिनेत्री आरती मोरे दिसत आहे. शिवानीने या मालिकेचा प्रोमो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करून तिने लिहिले आहे की, “सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज? नवीन मालिका कुसुम. लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.”
हा प्रोमो पाहून असे लक्षात येत आहे की, एक मुलगी सासर आणि माहेर किती उत्तमरीत्या सांभाळू शकते, ही कहाणी मालिकेतून दाखवणार आहेत. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या नव्या-कोऱ्या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करत आहे. बालाजी टेलिफिल्म्स निर्मित या मालिकेची कहाणी जबरदस्त असणार आहे. असा अनेक प्रेक्षक अंदाज लावत आहेत. (Shivani baokar’s new serial’s promo viral on social media)
शिवानीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. शिवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘लागिर झालं जी’ या मालिकेत काम केले आहे. त्यानंतर तिने ‘उंडगा’ आणि ‘युथ ट्यूब’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच तिने काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत
-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते
-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट










