Wednesday, July 3, 2024

मराठी मनोरंजनविश्वातील मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी या सासूसुनेच्या जोडीचे फोटो व्हायरल

मनोरंजनविश्वात नेहमीच लोकप्रिय जोड्यांसोबतच सासू सुनेच्या जोडीची देखील जोरदार चर्चा असते. इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस सासू सुनेच्या जोड्या नेहमीच या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजताना दिसतात. या क्षेत्रातील सासू आणि सून यांच्याबद्दल अनेकदा आपण विविध गोष्टी ऐकतो, वाचतो, पाहतो. मराठी सिनेसृष्टीमधे सध्या एका सासू सुनेची जोरदार चर्चा आहे, ही सासू सुनेची जोडी कमी आणि मैत्रिणींची जोडीचं जास्त दिसते. ही जोडी आहे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळी यांची.

काही दिवसांपूर्वीच मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आणि अभिनेता विराजस कुलकर्णी याने शिवानीसोबत लगीनगाठ बांधली. या दोघांचे लग्न तुफान गाजले. अगदी त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमापासून ते रिसेप्शनपर्यंत सर्वच गोष्टी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील अमाप लोकप्रिय झाले. आता या लग्नाच्या फिव्हरमधून बाहेर येते शिवानीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या सासूसोबतचे अर्थात मृणाल कुलकर्णी सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

शिवानीने शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये दोघी सासू सुना एका साड्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट करताना दिसत आहे. यावेळी मृणाल यांनी मरून रंगाची अतिशय सुंदर साडी त्यावर केसांचा अंबाडा, गजरा असा साधा मात्र लक्षवेधी लूक केलेला दिसत आहे. तर शिवानीने पिवळ्या रंगाची साडी त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाउज आणि अतिशय सुंदर मेकअप केलेला दिसत असून दोघीही एकमेकींना कॉम्प्लिमेंट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघींमध्ये असलेले बॉंडिंग आणि प्रेम स्पष्ट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हे व्हिडिओ आणि फोटो कमालीचे व्हायरल झाले असून, यावर कलाकारांसोबतच फॅन्स देखील कमेंट्स करताना दिसत आहे. याआधी देखील या दोघींचा व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिनेसृष्टी पुन्हा शोक सागरात, भरदिवसा ‘या’ प्रसिद्ध मॉडेलने घेतला गळफास

कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही 

 

हे देखील वाचा