Monday, July 1, 2024

विराजस शिवानीच्या लग्नाला एक महिना पुर्ण, सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे धमाल फोटो

दिर्घकाळ प्रेमप्रकरणाची चर्चा झाल्यानंतर या सगळ्या चर्चांना पुर्णविराम देत विराजस कुलकर्णी (virajas) Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole)  विवाह बंधनात अडकले. मराठी सिने जगतातील या क्युट कपलच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. गेल्या महिन्यात ४ जूनलाच शाही विवाह सोहळा पार पडला. आता लग्नाला एक महिना झाल्यानंतर शिवानीने दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामधील लग्नातील त्यांची न पाहिलेली धमाल,मस्ती पाहायला मिळत आहे.  शिवानीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. 

शिवानी रांगोळे विराजस कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाची दिर्घकाळ चर्चा सुरू होती. या चर्चांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता लग्नाला एक महिना पुर्ण झाल्यानंतर शिवानीने पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत जंगी सेलिब्रेशन केले आहे. या व्हायरल फोटोंंमध्ये विराजस आणि शिवानीच्या लग्नातील अनेक न पाहिलेले, भावूक करणारे, तर मजा मस्ती करताना दिसत असलेले अनेक क्षण पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री शिवानीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान शिवानी आणि विराजसची पहिली भेट एका नाटकाच्या सेटवर झाली होती. ज्यामध्ये शिवानीने अभिनय केला होता. या भेटीपासून त्यांच्यात मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. याच मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विराजस हा अभिनेता तसेच दिग्दर्शक आहे. अनेक गाजलेल्या  नाटकांचे त्याने लेखन केले आहे. त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तर शिवानीनेही ‘बनमस्का’ मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा