Monday, July 1, 2024

विराजस आणि शिवानीने हलव्याचे दागिने घालून साजरी केली पहिली संक्रांत, फोटो झाले व्हायरल

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…म्हणत आपण सर्वांनी नुकताच मकरसंक्रांत हा सण साजरा केला. संक्रांत हा सण नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी जास्त खास असतो. आपल्या परंपरेनुसार लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा संक्रांत येते तेव्हा त्या नवीन जोडप्याला हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाचे कपडे घालून तयार केले जाते. यावर्षी मराठी मनोरंजनविश्वात देखील अनेक जोडप्यांची ही पहिलीच संक्रांत होती. त्यातलेच एक जोडपे म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे.

विराजस आणि शिवानी या दोघांनी देखील हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करत त्यांची संक्रांत साजरी केली. सध्या या दोघांच्या संक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवानी आणि विराजस या नव्या लूकमध्ये अतिशय गोड दिसत आहेत. शिवानीने काळ्या रंगाची पारंपरिक साडी नसेल आहे तर विराजसने काळा कुर्ता परिधान केला आहे. या फोटोंसोबतच दोघांनीही सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

तत्पूर्वी शिवानी आणि विराजस यांनी ३ मे २०२२ रोजी जवळच्या लोकांच्या उपस्थित लग्न केले. शिवानीला बनमस्का या मालिकेतून अमाप प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. तर विराजसने ‘माझा होशील ना’ या मालिकेतून ओळख मिळवली. विराजस हा उत्तम अभिनेत्यासोबतच एक उत्तम दिग्दर्शक आणि लेखकही आहे.

शिवानी देखील अभिनेत्रींसोबत एक उत्तम कवयत्री आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘रेन्स कॉफी अँड टुमॉरो’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. लवकरच मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ]एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे नाव ‘फक्त महिलांसाठी’ असे आहे. सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा