‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतील संजीवनी-राजेश्री वहिनी साहेबांचा भन्नाट डान्स, चाहतेही करतायेत भरभरून कौतुक


सध्या सोशल मीडिया हे केवळ संवादाचे नाही तर आपले कलागुण सादर करण्याचे माध्यम झाले आहे. सोशल मीडियाचा वापर करत नाही, असे क्वचितच लोक असतील. अगदी सामान्य माणसांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी शेअर करत असतात. यातच समावेश होतो तो म्हणजे शिवानी सोनारचा. नाही ओळखलत का?? शिवानी सोनार म्हणजे संजीवनी रणजीत ढाले पाटील. काय? आता पटली ना ओळख!!

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. शिवानीने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

शिवानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची साथ दिलीये श्रृती अत्रेने. या व्हिडिओमध्ये त्या दोघींनी ‘चल छैया छैया’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. दोघींनीही लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या दोघींच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून त्यांचे चाहते खूपच खुश झाले आहेत. अनेकजण त्यांना कमेंट करून त्यांच्या या डान्सचे कौतुक करत आहेत.

मालिकेमध्ये ज्या राजेश्री वहिनीसाहेब संजीला त्यांच्या सावलीला देखील उभी करत नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यात कुरबुर होत असते. अशा या जावांचा जोरदार डान्स परफॉर्मन्स पाहून चाहते हैराण झाले आहेत. मालिकेमध्ये सतत भांडणाऱ्या शिवानी आणि श्रृती या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांच्यातील हो मैत्री पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत.

शिवानी सध्या तिच्या कलर्स मराठीवरील मालिकेमधून प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील तीचं पात्र प्रत्येक सामान्य मुलीला भावनार आहे. तसेच या आधी तिने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत आंबेडकरांच्या बहिणीचे पात्र निभावले आहे. पण ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेने तिला सर्वत्र ओळख मिळाली.


Leave A Reply

Your email address will not be published.