Tuesday, July 9, 2024

‘राजा राणीची गं जोडी’मधील संजूचे सौंदर्य पाहून हरपेल तुमचेही भान, एकदा नजर टाकाच’

मराठी मालिका या प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडतात. कारण त्यातील पात्र सर्वांना आपल्या जवळची आणि हवीहवीशी वाटतात. यातीलच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘राजा राणी ची गं जोडी.’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री शिवानी सोनार ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. अनेक टॉप अभिनेत्रींना मागे सारून शिवानी आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. या मालिकेतील तिचे डायलॉग, हावभाव, इमोशन या सगळ्या गोष्टी ती अगदी परफेक्ट करत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

शिवानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे यावर तिने डायमंडचे ईअरिंग घातले आहेत. तसेच ड्रेसला साजेसा असा मेकअप केला आहे. (Shivani sonar share her beautiful photo on social media)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या लूकवर कमेंट करत आहेत. हा फोटो शेअर करून तिने केवळ हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. ‘राजा राणीची गं जोडी” मालिकेत संजूचे पात्र निभावणाऱ्या शिवानीला या पोशाखात पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

शिवानी ही घराघरात पोहचली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मालिकेतील तिचे संजीवनी नावाचे पात्र देखील चांगलेच गाजत आहे. याआधी तिने ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात भूमिका निभावली होती तसेच तिने ‘पांडू’ आणि ‘अगली डेस्क’ या चित्रपटात देखील काम केले आहे. पण यातून तिला काही फारसी ओळख मिळाली नव्हती. या मालिकेने तिची लोकप्रियता शिखराला पोहचवली आहे.

हेही वाचा :
‘मुघलांनी देशाला गौरवशाली इतिहास दिला’, म्हणणारे नसरुद्दीन शाह सोशल मीडियावर ट्रोल

सोनाली खरेचा मुलीसोबत भन्नाट व्हिडिओ समोर, पाहून ओळखणेही होईल कठीण मुलगी कोण आणि आई कोण?

ब्रेकिंग! अभिनेत्री नोरा फतेही कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांमध्ये काळजीचे वातारण

 

हे देखील वाचा