Saturday, June 29, 2024

किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. प्रेक्षकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना या घरात एकत्र पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा खेळ ऐन रंगात येत असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे. या पर्वातील स्पर्धक असणाऱ्या कीर्तनकार शिवलीला पाटील या बिग बॉसच्या घरातून मधेच बाहेर पडल्या आहेत. नाही नाही त्या एलिमिनेट होऊन घराबाहेर पडत नसून, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना उपचारासाठी बाहेर पडावे लागत आहे.

शिवलीला यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात येत असल्याचे बिग बॉसने सांगितले आहे. बुधवारी (२९ सप्टेंबर) ला झालेल्या भागात बिग बॉसकडून त्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही माहिती देण्यात आली. याशिवाय शिवलीला बाहेर पडल्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरातील सर्व वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या आहेत.

बिग बॉसच्या घरात ‘नाव मोठे लक्षण खोटे’ हा नॉमिनेशन टास्क झाला. या नॉमिनेश टास्कमध्ये घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, घरातील कार्यातील कामगिरी, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या सर्व मुद्द्यांवर घरातील स्पर्धकांना नॉमिनेट करायचे होते. या टास्कमध्ये शिवलीला यांनासुद्धा नॉमिनेट करण्यात आले.

नॉमिनेट झाल्यानंतर शिवलीला यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितले, “मला हा खेळ समजायला वेळ लागला, पण आता इथून पुढे सर्व गोष्टींमध्ये माझा सहभाग असेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचे घर आहे. इथे फक्त काड्या लावणे, कुचाळक्या करणे हेच काम केले जाते. असेच प्रत्येकाला वाटते. मात्र मी असा विचार कधीच केला नव्हता. मी या घरात येताना ठरवले होते की, जेव्हा इथे येईल तेव्हा इथला प्रत्येक माणूस माझा असेल. मी जरी आठ दिवस या घरात राहिले तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेल त्यादिवशी घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी येईल.”

बिग बॉसचे हे नवीन पर्व सुरू होऊन काहीच दिवस उलटले आहे. प्रत्येक सदस्यांबद्दल प्रेक्षकांना हळूहळू खरे काय आहे ते समजू लागले आहे. या पर्वात शिवलीला पाटील यांचा सहभाग सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. कीर्तनकार असणाऱ्या शिवलीला यांनी बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

शिवलीला पाटील ह्या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असून, त्यांना कीर्तनाचा वारसा वडिलांकडूनच मिळाला आहे. शिवलीला यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून कीर्तनास सुरुवात केली असून, त्यांनी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक कीर्तने केली आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

 

हे देखील वाचा