‘रिफ्यूजी’ चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. अभिषेकची तुलना नेहमीच त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते. अभिषेक सध्या घरामुळे चर्चेत आला आहे. सेलिब्रिटी नवीन घरे विकत घेतात. मात्र, अभिषेक बच्चनने आपली एक घर विकले आहे.
राणी मुखर्जीने अलीकडेच कोट्यवधींसाठी एक नवीन अपार्टमेंट विकत घेतले, पण दुसरीकडे अभिषेक बच्चने मुंबईत आपलं लक्झरी अपार्टमेंट विकले आहे. हे ऐकून चाहत्यांनाही खूप आश्चर्य वाटले आहे.
अभिषेक बच्चनने आपला एक जुने अपार्टमेंट ४५.७५ कोटी रुपयांना विकले आहे. खरं तर अभिषेक आणि त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य या अपार्टमेंटमध्ये राहत नव्हता. अभिनेता त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबईतील बच्चन कुटुंबाच्या घरी जलसा येथे राहतो.
अभिषेक बच्चनचे घर ‘ओबेरॉय ३६०’ च्या ३७ व्या मजल्यावर होते. इतकेच नव्हे, तर २०१४ मध्ये अभिषेकने हे घर ४१ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुख्य म्हणजे अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांचेही याच इमारतीत अपार्टमेंट्स आहेत. पण आता अभिषेकने हे घर का विकलं आहे, हे कोणालाच माहिती नाही.
अमिताभ बच्चनने यावर्षी मे मध्ये ड्युप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतले होते. अंधेरीत खरेदी केलेल्या या घराची किंमत ३१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अभिषेक शेवटचा ‘द बिग बुल’ या चित्रपटात दिसला होता. स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाबद्दल अभिषेकचेही खूप कौतुक करण्यात आले.
अभिषेक आता ‘दसवीं’ या चित्रपटात निमरत कौर आणि ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात चित्रांगदा सेनसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेत्री सारा अली खानने पॅपराजींसोबत साजरा केला तिचा वाढदिवस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
-आमिर काढत होता कियाराचा अडकलेला मास्क; पण नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल, म्हणाले…










