Friday, July 5, 2024

शॉकिंग! अवघ्या तिशीत ‘या’ अभिनेत्याला झाली देवाज्ञा, कॅन्सरने घेतला बळी

मागील काही काळापासून कलाविश्वातून दु:खद बातम्या समोर येत आहेत. यामध्ये आता आणखी एक चटका लावणारी घटना घडली आहे. ज्यामुळे सिनेसृष्टी शोकसागरात आहे. शनिवारी (दि. ०२ जुलै) प्रसिद्ध अभिनेता किशोर दास याला देवाज्ञा झाली. आसामी अभिनेता किशोरच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. किशोरने अवघ्या ३० वर्षांच्या वयात जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनाने त्याच्या जवळच्या नातेवाईकांसोबतच चाहत्यांनाही शोक अनावर झाला आहे.

अभिनेता किशोर दास (Kishor Das) याने शनिवारी चेन्नई येथील एका रुग्णालयात जगाचा निरोप घेतला. हाती आलेल्या वृत्तानुसार, तो मागील काही काळापासून कर्करोगाने ग्रस्त होता. या आजारावर तो बऱ्याच काळापासून उपचार घेत होता. मात्र, दीर्घकाळ लढा देऊनही त्याला आयुष्याची लढाई जिंकण्यात अपयश आले. त्याच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.

 

माध्यमांतील वृत्तानुसार, किशोर दास चेन्नईपूर्वी गुवाहाटीमध्ये उपचार घेत होता. मात्र, तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे त्याला पुन्हा चेन्नईला हलवण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे, किशोरला यावर्षी मार्चमध्ये आगाऊ उपचारासाठी चेन्नईला पाठवण्यात आले होते. माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले की, किशोरला कर्करोगाव्यतिरिक्त (Kishor Das Cancer) कोरोना व्हायरसचीही लागण झाली होती. अशात असेही म्हटले जात आहे की, त्याच्या निधनामागील कारण कोरोना व्हायरस आहे.

किशोरबद्दल थोडं काही
कर्करोगादरम्यान कोरोना झाल्यामुळे किशोरची (Kishor Das Corona Virus) तब्येत वारंवार बिघडत गेली. त्यामुळे त्याने या जगाचा निरोप घेतला. किशोर हा आसामचा प्रसिद्ध अभिनेता होता. त्याने आतापर्यंत ३००हून अधिक म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. त्याचे गाणे ‘तुरूत तुरूत’ हे आसाम सिनेसृष्टीतील अव्वल क्रमांकाचे गाणे ठरले होते. सिनेमा आणि गाण्यांव्यतिरिक्त त्याने टेलिव्हिजनमध्येही आपला हात आजमावला होता. सोबतच त्याने अनेक शॉर्ट सिनेमांमध्येही मोठ्या भूमिका साकारल्या होत्या.

अधिक वाचा-

सोळाव्या वर्षी ‘त्या’ एका गाण्याने खळबळ माजवणारी ‘शर्ली’ आज झालीये सत्तावीस वर्षांची

खतरों के खिलाडी १२ : शिवांगी जोशीला सोडले मगरीच्या पिंजऱ्यात, भितीने अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था

आली रे आली ‘कडक लक्ष्मी’ आली ‘तमाशा लाईव्ह’चे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा