Wednesday, July 3, 2024

कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

‘सांड की आँख’ या चित्रपटाने प्रसिद्ध झालेल्या नेमबाज आजी चंद्रो तोमर यांचे शुक्रवारी (३० एप्रिल) निधन झाले आहे. मेरठच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून समजले की, श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. नेमबाज आजी उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी होत्या. त्याचबरोबर आजींची ही बातमी ऐकल्यानंतर, अभिनेत्री तापसी पन्नू हिने शोक व्यक्त केला आहे.

तापसी पन्नू तापसी हिने ट्वीट केले की, “तुम्ही नेहमीच प्रेरणा असाल. अशा सर्व मुलींमध्ये आपण जिवंत राहाल, ज्यांना आपण जिवंत राहण्याची आशा दिली होती. माझे सगळ्यात प्रिय रॉकस्टार देव तुमच्या आत्म्यास शांती देवो.”

भूमी पेडणेकर हिने नेमबाज दादी म्हणजेच चंद्रो तोमर यांचा फोटोही शेअर केला आहे. भूमी पेडणेकर लिहिते की, “चंद्रो तोमर आजी यांच्या निधनामुळे मला फार वाईट वाटले आहे. प्रत्यक्षात असे दिसते की, जणू माझा एक भागच निघून गेला आहे. त्या कुटुंबाच्या एका भागासारख्या होत्या. असं वाटतंय की, कुटुंबाचा एक भागच निघून गेला आहे. त्यांनी महानतेने परिपूर्ण आयुष्य जगले, आणि आपल्या आयुष्यातील बर्‍याच लोकांना प्रभावित केले. पितृसत्तावर प्रश्नचिन्ह उभे केले, आणि युगवादाची प्रत्येक युक्ती तोडली.”

तिने पुढे लिहिले की, “त्यांचा वारसा त्या सर्व मुलींवर राहील, ज्यासाठी त्या एक आदर्श व्यक्ती बनल्या होत्या. मला खूप चांगले वाटत आहे की, मला त्यांचे आयुष्य आणि संघर्ष पडद्यावर दाखवण्याची संधी मिळाली. त्यांच्यासारखी होण्याची ही प्रक्रिया होती. आयुष्याबद्दल, आणि एक स्त्री बनण्याबद्दल मला खूप काही शिकवलं. मला वाटतं की, मी त्यांचीच आहे. त्यांच्यात नेहमीच धैर्य, करुणा, आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्या एक महान एअर पिस्तूल नेमबाज, एक अभूतपूर्व शिक्षक, एक हुशार वक्ता आणि एक खोडकर व्यक्ती. मी त्यांच्या कुटुंबाच्या, आणि त्यांच्या सर्व हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे.

चंद्रो तोमर यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती बिघडल्यामुळे शुक्रवारी त्यांचे निधन झाले. नेमबाज आजींनी त्यांची बहीण प्रकाशी तोमर यांच्यासह बर्‍याच स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्या जगातील सर्वात वयस्कर नेमबाज मानल्या जात होत्या.

इतकेच नाही, तर त्यांच्या आयुष्यावर आधारित बनलेला बॉलिवूडमध्ये ‘सांड की आँख’ चित्रपट बनला होता. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूने या दोन तोमर बहिणींची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’

-अवघ्या देशाला नजरेने वेड लावणारी प्रिया प्रकाश वाॅरियर, आता नव्या लूकनेही पाडतेय सर्वांना भुरळ! पाहा खास फोटो

-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप

हे देखील वाचा