सध्या सोशल मीडियावर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बालपणीचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत जे त्यांच्या चाहत्यांना ओळखायला लावले जात आहेत. त्यांच्या या क्यूट आणि गोंडस फोटोंना ओळखणे चाहत्यांना कठीणही जाते. कोणता फोटो कोणत्या अभिनेत्रीच्या बालपणीचा आहे इतक्या सहजासहजी ओळखणे कठीण झाले आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोज एका नव्या चेहऱ्यासह नव्या स्टारचे बालपणीचा फोटो पाहायला मिळतो. असाच एक फोटो आज पुन्हा व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीव्हीच्या टॉप अभिनेत्रीचा समावेश आहे. जो कोणालाही ओळखणे अशक्य आहे. फोटोमध्ये दिसणार्या या अभिनेत्रीचे नुकतेच लग्न झाले आहे, टीव्हीवर तिला ‘प्रीता’ या नावाने ओळखले जाते.
आता या माहिती नंतर तुम्ही या अभिनेत्रीचे नाव ओळखले असेल. ही दुसरी तिसरी कोणी नसून टीव्हीची सर्वात आवडती अभिनेत्री श्रद्धा आर्या(Shraddha Arya) आहे. दातांमध्ये बोटं चावून हसणारा हा निरागस चेहरा, तसंच लाल बांगड्या घालून आपल्या निरागसतेची झलक दाखवणारा श्रध्दा आर्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जो तिच्या चाहत्यांना सुद्धा ओळखता आला नाही.
दरम्यान श्रद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते, आणि तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. कामात व्यस्त असतानाही ती अनेकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांशी जोडलेली असते. लग्नानंतर श्रद्धा आर्या दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस बनताना दिसत आहे. तिच्या प्रत्येक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. आपल्या चाहत्यांशी ती नेहमीच नवनवे फोटो शेअर करताना दिसत असते. तिने कुंडली भागिय कुमकुम भाग्य अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. यामधील तिच्या भूमिकांंना चाहत्यांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
नो मेकअप लूकमध्येही अतिशय सुंदर दिसणाऱ्या सपना चौधरीने पार्किंगमध्येच लगावले जोरदार ठुमके