Thursday, July 18, 2024

काय सांगता ! श्रद्धा कपूरने गुपचूप उरकले लग्न? सात फेरे घेताना व्हिडिओ होतोय व्हायरल

श्रध्दा कपूर (Shraddha Kapoor)  ही हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने श्रध्दाने हिंदी चित्रपट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच श्रध्दाची हिंदी चित्रपट जगतात हरहुन्नरी अभिनेत्री अशी खास ओळख आहे. आपल्या दमदार  आणि आव्हानात्मक  भूमिकांसाठी ओळखली जाणारी श्रध्दा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. यावरुन ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हडिओ शेअर करत असते. श्रध्दाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे जे तिच्या या फोटोंला नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. सध्या सोशल मीडियावर श्रध्दाचा नववधूच्या पेहरावातील फेरे घेतानाचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामुळे श्रध्दाने लग्न केले की काय? असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील सत्य चला जाणून घेऊ. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अभिनेत्री श्रध्दा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती नववधूच्या पेहरावात लाल साडी घालून लग्नाचे विधी करताना, फेरे घेताना दिसत आहे. यावेळी या पेहरावात ती खूपच मनमोहक दिसत आहे. तिचा हा लूक आणि लग्नाचे विधी पाहून श्रद्धा खरोखर लग्न करतेय की काय असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पण हा व्हिडिओ तिने एका ज्वेलरीच्या जाहिरातीसाठी शूट केला आहे. त्यासाठीच तिने अशाप्रकारे नववधूचा पोशाख केला आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करत श्रद्धाने “मला सोने घालायला खूप आवडते पण काम झाल्यानंतर त्याला कपाटात बंद करुन ठेवणे आवडत नाही, त्यामुळे मी अशा सगळ्या दागिन्यांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही घालू शकता,” असा कॅप्शन दिला आहे. सध्या श्रध्दाचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर तिच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच तिच्या ‘लव रंजन’ या आगामी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे तसेच ती चालबाज इंन लंदन या चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम

मैत्रिणीसाठी गाणे गाताना अचानक रडू लागली आम्रपाली दुबे, जाणून घ्या नक्की काय आहे कारण

जितेंद्र यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते फक्त ‘इतके’ रुपये; तर ६ महिने मिळाला नव्हता पगार

हे देखील वाचा