Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड श्रद्धा कपूरला ‘ग्रेट फील’ करून देणारा ‘तो’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण? अभिनेत्रीचे व्हॉट्सऍप चॅट लीक

श्रद्धा कपूरला ‘ग्रेट फील’ करून देणारा ‘तो’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण? अभिनेत्रीचे व्हॉट्सऍप चॅट लीक

सामान्य लोकं जेव्हा कलाकार होतात तेव्हा कदाचित यांचे वैयक्तिक आयुष्य हे त्यांचे राहतच नाही, ते सार्वजनिक होते. कारण त्याच्या अवतीभोवती सतत २४ तास मीडियाचे कॅमेरे डोळे लावून बसलेले असतात. त्यामुळे कलाकारांच्या छोट्या छोट्या गोष्टी लगेच मीडियामध्ये येतात आणि गाजायला लागतात. त्यामुळे कलाकरांना त्याचे वैयक्तिक जीवन खासगी ठेवण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. कधी नजरचुकीने काही झालेच तर मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये ते कैद होते आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईन बनते.

अशीच काहीशी घटना अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत झाली आहे. श्रद्धाला पॅप्पराजींनी एका ठिकाणी स्पॉट केले. यावेळी श्रद्धाने सर्वात आधी तिच्या लुक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. पॅप्पराजींना पोज देण्याकडे श्रद्धाचे लक्ष नव्हते, तिचे संपूर्ण लक्ष तिच्या मोबाइलमध्ये होते. ती कोणासोबत तरी चॅट करत होती. जेव्हा श्रद्धाच्या लक्षात आले की, फोटोग्राफर्स समोर आहेत आणि तिला निघायचे आहे, तेव्हा ती फोनमधून लक्ष काढत चालू लागली. पॅप्पराजींच्या एवढ्या कॅमेऱ्यांमध्ये श्रद्धा तिच्या फोनसोबत तर कैद झालीच, शिवाय तिच्या फोनची स्क्रीन ऑन असल्याने तिची मोबाइल विंडो देखील स्पॉट झाली. यामध्ये ती कोणासोबत तरी चॅट करत असल्याचे दिसले. (shraddha kapoor personal whatsapp chat leaks)

या चॅटमध्ये ती कोणीतरी खास असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलताना दिसली. कारण त्या व्यक्तीच्या नावाच्या ठिकाणी ती हार्टचे ईमोजी होते. श्रद्धाने मेसेजमध्ये लिहिले होते की, “मी कधीच माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या माणसाला पाहिले नाही.” यावर समोरून मेसेज आला ‘मला आनंद आहे की तू असा विचार करते.’ यानंतर श्रद्धाने लिहिले, “तू खरंच ऐकून घेतो, असे कोणी नव्हते. तू नेहमी मला ग्रेट असल्याची भावना देतो.” यावर समोरून हार्ट शेपचा ईमोजी आला. श्रद्धाने पून्हा लिहिले, “हो तू करतोच. माझ्या सर्व इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी धन्यवाद.” यावर उत्तर येते, ‘हे माझे भाग्य आहेय, जेव्हा काही पाहिजे असेल तेव्हा सांग.’

आता श्रद्धाचे असे मेसेज लीक झाल्यांनतर ती नक्की कोणाशी बोलत होती या चर्चाना उधाण आले आहे. मागील काही काळापासून श्रद्धा आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांच्या अफेयरच्या बातम्या येत आहे. हे चॅटिंग श्रद्धा रोहणसोबत करत होती का, कि दुसऱ्यासोबत हा प्रश्न पुढे आला आहे. श्रद्धा लवकरच दिग्दर्शक लव्ह रंजन यांच्या सिनेमात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा