Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड स्त्री-२ नंतर हे असतील श्राद्धाचे आगामी सिनेमे, कधी नागीण तर कधी बनणार कॅटिना…

स्त्री-२ नंतर हे असतील श्राद्धाचे आगामी सिनेमे, कधी नागीण तर कधी बनणार कॅटिना…

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. स्त्री 2 हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या रिलीज नंतर श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर खूप फॉलोअर्स वाढले. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली ती दुसरी भारतीय झाली आहे. यानंतर प्रेक्षक श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घेऊया श्रद्धाच्या आगामी चित्रपटांबद्दल…

स्त्री 3

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री 2’ च्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षक ‘स्त्री 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘स्त्री 2’ नंतर श्रद्धा ‘स्त्री 3’ मध्येही दिसणार आहे. अभिनेता अभिषेक बॅनर्जीने अलीकडेच याबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले होते की या चित्रपटाच्या स्क्रिप्टचा काही भाग तयार आहे. दुसऱ्या भागापेक्षा हा आणखी मजेशीर असणार आहे. मात्र, या चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार किंवा तो कधी पडद्यावर येणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

चालबाज इन लंडन

पंकज पराशर दिग्दर्शित ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटातही श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. सध्या याच्या शूटिंग आणि रिलीज डेटबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. श्रध्दाच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत.

कॅटिना

श्रद्धा कपूरचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. एका बातमीनुसार, श्रद्धा कपूर लवकरच असीमा छिब्बर दिग्दर्शित केटीनामध्ये दिसणार आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा तिच्या स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

नागीन

श्रद्धाचा नागिन नावाचा चित्रपटही आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित आणि निखिल द्विवेदी निर्मित या चित्रपटात श्रद्धा इच्छाधारी नागिनची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही.

नो एंट्री सिक्वेल

निर्माता बोनी कपूर यांच्या हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. बोनी कपूरने काही काळापूर्वी आपल्या पुरुष लीड कास्टिंगबद्दल खुलासा केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरला नो एंट्रीचा सीक्वल ऑफर करण्यात आला आहे. मात्र, त्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

फरहान अख्तरला आईने सोडायला लावले होते घर; म्हणाली, तू तुझ्या वडिलांकडे जाऊन राहा…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा