Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘काही गोष्टी करायला धाडस लागतं’, म्हणत श्रेया बुगडेने केला ‘या’ खलनायिकेचा अभिनय

मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनवर अनेक खलनायिकांनी त्यांच्या कामाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. त्यांचे काम बघून प्रेक्षक देखील त्यांचाबाबत वाईट बोलले आहेत. परंतु हीच खरी त्यांच्या कामाची पोचपावती आहे. यातीलच एक खलनायिका म्हणजे उषा नाडकर्णी. ‘माहेरची साडी‘ या प्रसिद्ध चित्रपटात खाष्ट सासूचे पात्र निभावून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. त्यांची ती भूमिका घराघरात पोहचली. त्यानंतर त्यांची प्रतिमा प्रेक्षकांच्या नजरेत नकारात्मक राहिली. अनेकांनी त्यांच्या त्या विशेष स्वभाव गुणाचा आणि भाषाशैलीचा अभिनय केला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील एक लोकप्रिय शो आहे. या शोमधील कलाकार अनेक इतर कलाकारांचा अभिनय करत असतात. या शोमधील अभिनेत्री श्रेया बुगडे ही अनेक कलाकारांचा अभिनय करत असते. तिने उषा नाडकर्णी यांचा अभिनय केला आहे. परंतु आता तिने खुद्द उषा नाडकर्णी यांच्यासमोर त्यांचा अभिनय केला आहे. (shreya bugde do acting of usha nadkarni)

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन शो सुरू होणार आहे. यास शोमध्ये आता अनेक कलाकार त्यांच्या पाक कलेच्या रेसेपी घेऊन येणार आहे. या निमित्त या शोमध्ये श्रेया बुगडे आणि उषा नाडकर्णी या येणार आहेत. यावेळी श्रेया त्यांच्यासमोर त्यांचा अभिनय करत असते. यावेळी तिचा अभिनय पाहून सगळेच डोक्याला हात लावतात. परंतु आऊ मात्र हसत असतात. त्यांना तिचा अभिनय खूप आवडला. नंतर त्या तिला मिठी देखील मारतात.

हा व्हिडिओ श्रेयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “काही गोष्टी करायला धाडस लागतं, खूप खूप प्रेम आऊ.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खास म्हणजे या पोस्टवर अनेक कलाकारांच्या कमेंट येत आहेत. अनेकजण तिच्या अभिनयाला दाद देऊन तिचे कौतुक करत आहेत.

या व्हिडिओवर अभिनेत्री तेजश्री प्रधानने कमेंट केली आहे की, “तू कमाल आहेस श्रेया.” तसेच अमृता खानविलकरने कमेंट केली आहे की, “क्वीन आहेस बेबी तू क्वीन.” तसेच अभिजित खांडकेकरने ‘आउटस्टँडिंग’ अशी कमेंट केली आहे. यासोबतच अनेक कलाकार या पोस्टवर कमेंट करत आहेत.

हेही वाचा :

फिरोज खानने जया बच्चन यांच्यावर केली अपमानास्पद टिप्पणी, म्हणाले ‘नटगुल्ली पत्नी…’

‘प्रत्येक घरातली माता भगिनी…’, म्हणत मराठमोळ्या प्राजक्ता माळीने शेअर केला ‘पावनखिंड’ चित्रपटाचा टिझर

सवत माझी लाडकी! ‘रंग माझा वेगळा’मधील दीपा आणि आयशाचा डान्स व्हिडिओ व्हायरल 

 

हे देखील वाचा