Saturday, July 6, 2024

क्या बात है! श्रेयस अन् मुक्ता खेळणार ‘आपडी थापडी’चा खेळ, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यासोबत ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या “आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचं छायांकन सुमन साहू यांचे आहे. चित्रपटाचं पोस्टर फील गुड असल्याने ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिलीबरोबर’ अशी टॅग लाईन असल्याने हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि सहकुटुंब पाहता येईल यात शंका नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि चित्रपटांतून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यानं हिंदी चित्रपटांत आपलं स्थान निर्माण केलं. ‘बाजी’ आणि ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठी चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं ‘आपडी थापडी’ नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘माझ्या वडिलांच्या जीवाला धोका, रितेश-अभिषेक मदत करा’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे ट्वीट व्हायरल
बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल
‘ही लज्जास्पद गोष्ट…’, पंतप्रधानांचा फोटो शेअर करत शिवसेनेच्या महिला खासदारांनी व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण

हे देखील वाचा