Wednesday, July 3, 2024

‘मित्रांनी पाठीवर वार केले आहेत’, मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा चित्रपटसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासा

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे याने अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो गोलमाल चित्रपटाच्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. पण आता हा अभिनेता श्रेयस तळपदे बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. श्रेयसचा २ वर्षात कोणताही चित्रपट पडद्यावर प्रदर्शित झालेला नाही. दरम्यान, या अभिनेत्याने आपले करियर आणि सिनेमाचे वाईट अनुभव शेअर केले आहेत.

‘इक्बाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल ३’ आणि ‘हाऊसफुल २’ अशा अनेक चित्रपटांसाठी श्रेयस तळपदे याचे कौतुक झाले आहे. अशातच आता अभिनेता श्रेयस तळपदे याने, चित्रपटसृष्टीतील लोकांबद्दल भाष्य केले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, श्रेयस तळपदे याने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ‘इक्बाल’ वगळता एकही चित्रपट एकट्याने न केल्याबद्दल अभिनेताने म्हटले आहे की, त्याच्यामध्ये स्वतःची प्रसिद्धी करण्याची क्षमता कमी आहे. मला वाटते की, आपल्या कामामुळे आपल्याला अधिक काम मिळाले पाहिजे. पण असं होत नाही.

श्रेयस म्हणाला की, “मला माहित आहे की बर्‍याच कलाकारांना माझ्याबरोबर काम करताना असुरक्षित वाटते, आणि मला चित्रपटांत घेऊ इच्छित नाहीत. मित्रांचे हित लक्षात घेऊन मी, काही चित्रपट केले आहेत, पण त्यानंतर त्याच मित्रांनी माझ्या पाठीवर वार केले आहेत. असे काही मित्र आहेत, ज्यांनी पुढे जाऊन चित्रपट बनवले आहेत.” तो पुढे म्हणाला आहे की, “हा अहंकार आहे.”

एवढेच नव्हे, तर श्रेयसने असेही म्हटले की, “एकेवेळी अमिताभ बच्चन यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता, मग आपण काय आहोत. ते खाली पडले पण त्यांनी पुन्हा उंच गगनाला स्पर्श केला आहे. आज मी जिथे आहे, तिथे मला आनंद आहे, पण माझे काम झाले नाही.”

“मी आता चांगल्या भूमिकांच्या शोधात आहे. कलाकार खूपच वाईट काळातून जात असतो. पण यामुळे आपल्याला वेळोवेळी बळकट होण्यास, आणि गोष्टींना अधिक महत्त्व देण्यात मदत होते. मला अभिनय करताना मरायची इच्छा आहे. सेटवर किंव्हा व्यासपीठावर अभिनय करताना.’ अभिनेत्याचा हा खुलासा सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रेयस तळपदे याने आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपट, आणि दूरदर्शनातून केली आहे. चाहत्यांनाही आता श्रेयसच्या एका चांगल्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा