Wednesday, July 3, 2024

श्रेयश तळपदेने आपल्या नावाचे फेक ट्विटर अकाऊंट बघताच चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूपच जवळचे नाते आहे. आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले राहण्यासाठी कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात. या सोशल मीडिया अकाऊंटवरून कलाकार नेहमीच वेगवगेळ्या पोस्ट शेअर करत त्यांच्या वैयक्तिक आणि व्यायसायिक आयुष्याची सर्वांना माहिती देतात. मात्र आज या सोशल मीडियावरही कलाकारांच्या नावाने विविध चुकीच्या गोष्टी देखील घडताना दिसतात. कलाकारांच्या नावाने कोणी खोटे अकाऊंट देखील तयार करतात आणि त्यावरून ते मेसेज देखील करतात.

अशीच एक गोष्ट घडली आहे, अभिनेता श्रेयश तळपदेच्या बाबतीत. मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतील अभिनेता असलेल्या श्रेयश तळपदेच्या नावाने देखील एक ट्विटरवर एक फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. याबद्दल खुद्द श्रेयशनेच माहिती दिली आहे. श्रेयसने ट्विट करत त्याच्या फॅन्सला या फेक अकाऊंटपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. श्रेयशचे खरे अकाऊंट आणि फेक अकाऊंट दोन्ही व्हॅरिफाईड असल्याने चाहत्यांना खरे अकाऊंट कोणते हे ओळखण्यासाठी समस्या नको म्हणून श्रेयसने हे ट्विट केले आहे.

श्रेयसने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सर्वांनी कृपया लक्षात घ्या, हे ट्वीट माझ्या अधिकृत अकाऊंटवरुन करण्यात आलेले नाही. माझ्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटचे नाव ‘श्रेयस तळपदे १’ असे आहे. सदर व्यक्ती माझ्या नावाचा वापर करुन चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही रिपोर्ट करा, त्यामुळे त्याचे ट्वीटर अकाऊंट बंद होऊ शकेल. सध्या ट्विटरवर ‘श्रेयस तळपदे’ या नावाने असलेले अकाऊंट व्हेरिफाईड आहे. त्या व्यक्तीने माझे नाव आणि माझे फोटो वापरले आहेत. माझा त्या अकाऊंटशी काहीही संबंध नाही.”. श्रेयश तळपदे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत असून, लवकरच ही मालिका बंद होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा