Wednesday, June 26, 2024

जान्हवी कपूरने श्रीदेवीबद्दल सांगितली कोणालाही माहित नसणारी ‘ही’ गोष्ट; म्हणाली, ‘लग्नानंतर आईने…’

जान्हवी कपूर नेहमीच या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये चर्चेत येत असते. ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीला प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारले. आज जान्हवी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. जान्हवीच्या पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच तिची आई असणाऱ्या श्रीदेवी यांनी या जगाचा निरोप घेतला. आज श्रीदेवी यांची पुण्यतिथी. या निमित्ताने जान्हवी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

जान्हवी कपूर तिची आई श्रीदेवीच्या (Sridevi) खूप जवळ होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीलाच धक्का बसला नाही, तर श्रीदेवीचे संपूर्ण कुटुंबही हादरले. जान्हवीलाही यातून सावरायला खूप वेळ लागला. आजही तिला नेहमी आईची आठवण येते. अलीकडेच, अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान तिच्या आईशी संबंधित एक गोष्ट शेअर केली आहे. (sridevi used to visit tirupati every birthday)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor)

 

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, ती तिच्या नशिबासाठी कोणतेही धार्मिक कार्य करते का? तर याला उत्तर देताना तिने सांगितले की, ती तिच्या प्रत्येक चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन तिरुपतीला नक्कीच जाते. कारण तिची आई (श्रीदेवी) दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी तिरुपतीला जायच्या. पण लग्नानंतर त्यांनी तसे करणे बंद केले. आता नवीन वर्ष आणि श्रीदेवींच्या वाढदिवसाला जान्हवी नक्कीच तिरुपतीला जाते.

अलीकडेच जेव्हा जान्हवी ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर पोहोचली, तेव्हा ती तिच्या आईबद्दल बोलली. त्या धक्क्यातून ती अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले. आणि यासाठी तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि बहीण अंशुला (Anshula Kapoor) यांनी जान्हवीला खूप पाठिंबा दिला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराच्या लग्नावर महंत राजू दास यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘ज्या समाजात संबंध प्रस्थापित…’
नवाजुद्दीन सिद्धीकीच्या नोकरणीने साक्ष बदलवताच भावाने साधला निशाणा म्हणाला, ‘अजून कितींना विकत घेणार?’

हे देखील वाचा