Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

उत्कृष्ट अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून ओळख मिळवणारी श्रिया पिळगावकर आहे ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री

मनोरंजनविश्वात खासकरून ओटीटी माध्यमावर आपल्या हटके आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा आज (२५ एप्रिल) ३३ वा वाढदिवस आहे. नेहमीच हटके आणि पठडीबाहेरील भूमिका निवडून आपल्यात असणाऱ्या सशक्त अभिनेत्रीला तिने सतत सिद्ध केले. २५ एप्रिल १९८९ रोजी मुंबईमध्ये श्रियाचा जन्म झाला. एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच ती दिग्दर्शिका, निर्माती देखील आहे. तिने मुंबईच्या सेंट झेवियर्समधून पदवी संपादन केल्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे आणि हार्वर्ड समर स्कुल यूएसएमधून अभिनयात डिप्लोमा केला. श्रियाने आतापर्यंत मिर्जापुर (2018), फॅन (2016), बीचम हाउस (2019) आणि हाउस अरेस्ट (2019) आदी अनेक उत्तम वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले.

श्रियाने वयाच्या पाचव्या वर्षीच बालकलाकार म्हणून ‘तू तू मैं मैं’ या हिंदी विनोदी मालिकेतून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या करणं शेट्टीच्या १० मिनिटांच्या ‘फ्रीडम ऑफ लव’ या शॉर्ट फिल्ममधे ती दिसली. पुढे ती तिच्या अभ्यासात व्यस्त झाली आणि सहा वर्षांनी तिने २०१८ साली ‘मिर्झापूर’मधून ओटीटीवर पदार्पण केले. यानंतर ती अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये झळकली. २०१३ साली आलेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकुलती एक’ या मराठी सिनेमातून तिने तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. पहिल्याच सिनेमासाठी तिला सहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तिच्या प्रभावी अभिनयामुळे तिला ऑस्कर विजेते निर्माते असणाऱ्या क्लाउड लेलच दिग्दर्शित फ्रांस सिनेमा असलेल्या ‘अन प्लस उन’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.

श्रिया पिळगावकरने आदित्य चोप्रा निर्मित आणि शाहरुख खान अभिनित ‘फॅन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. श्रियाने अनेक शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे. तिने हार्वर्डच्या समर स्कुलमध्ये असताना ‘पेंटेड सिग्नल’ आणि ‘पंचगव्य’ या शॉर्ट फिल्म आणि डॉक्यूमेंट्रीचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय तिने सिद्धार्थ जोगळेकरसोबत ‘ड्रेसवाला’ या फिल्मचे सहदिग्दर्शन केले. या सिनेमाला २०१२ साली मुंबई फिल्म फेस्टिवलला निवडले गेले होते. नुकतीच श्रियाची ‘गिल्टी माइंड्स’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा