सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अगदी कमी वयात खूप नाव कमावले आहे. अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राहते. ती दिवसागणिक स्टाईल आयकॉन बनत चालली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकली की ही बाब सहज तुमच्या लक्षात येईल.
नुकताच श्रियाने स्वतःचे एक फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. याद्वारे तिच्या फॅशन सेन्सचं दर्शन चाहत्यांना घडलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा बलून स्लीव्ह टॉप परिधान केला आहे. सोबतच तिने केस मोकळे सोडले आहेत आणि न्यूड मेकअप केला आहे. या स्टायलिश लूकमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते यावर सातत्याने कमेंट करून तिच्या फॅशन स्टेटमेंटचं कौतुक करत आहेत. तसेच ही पहिलीच वेळ नाहीये, तर या अगोदरही तिचे असे फोटोशूट्स बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर श्रिया लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘अरुंधती’चे पात्र साकारणार आहे, जी एक पत्रकार असते. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, झोया हुसेन आणि राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपट तेलगू भाषेत ‘अरण्य’ म्हणून, तर तमिळमध्ये ‘कदान’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे
-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा
-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात